गृहकर्जाच्या (Home loan) हप्त्यांच्या परतफेडीची अनेकांना चिंता असते. त्यातच तुमची बँक गृहकर्जावरील व्याज कमी करत नसेल तर तुम्ही होम लोन ट्रान्सफरचा विचार करू शकता. त्या माध्यमातून तुम्ही सध्याच्या EMI आणि व्याज दरावर अधिक बचत करू शकता. अशाच कर्जदारासाठी बजाज फिनसर्व्हची उपकंपनी बजाज मार्केट्सने काही बचतीच्या सुविधेसह गृहकर्ज शिल्लक हस्तांतरणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये पुढील काही सुविधा बजाज मार्केट्स ने उपलब्ध करून दिल्या आहेत.
काय आहे होम लोन बॅलन्स ट्रान्सफर सुविधा? Home Loan Balance Transfer facility
होम लोन बॅलन्स ट्रान्सफर सुविधेअंतर्गत, (Home Loan Balance Transfer) विद्यमान कर्जदार त्यांच्या वर्तमानातील गृहकर्जाची थकबाकी असलेली रक्कम नवीन बँक/कर्ज देणाऱ्या संस्थेकडे कमी व्याजदराने किंवा दीर्घ कालावधीसाठी हस्तांतरित करू शकतात. होम लोन बॅलन्स ट्रान्सफरवर दिलेल्या कमी व्याजदरामुळे तुमचा व्याजावरील खर्च कमी होतो. ज्यांनी जास्त व्याजदराने गृहकर्ज घेतले होते आणि आता बदलत्या बाजार परिस्थितीमुळे किंवा तुमच्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये चांगले बदल दिसून येत आहेत. त्यावेळी तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी ही सुविधा फायदेशीर आहे.
बजाज मार्केट्सचे गृहकर्ज हस्तांतरणाचे लाभ-
बजाज फिनसर्व्हची उपकंपनी बजाज मार्केट्स यांनी गृहकर्ज हस्तांतरण करण्यासाठी ग्राहकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्या गृहकर्जदारास त्यांचे कर्ज हस्तातरित करायचे आहे. त्यास बजाज मार्केटकडून कर्जदारास होम लोन बॅलन्स ट्रान्सफरचा व्याजदर 8.50 टक्क्यांपर्यंत कमी दराने दिला जात आहे. फक्त कमी व्याज दरच नाही तर कर्जदारास त्याचा महिन्याचा ईएमआय देखील कमी करता येतो. तसेच कर्जदारास होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्यासोबत टॉप-अप कर्ज देखील उपलब्ध होऊ शकते. कर्जदारास 1 कोटी रुपयांच्या रकमेपर्यंत कर्जाचे टॉपअप मिळू शकते. तसेच बजाज मार्केट्स मध्ये तुम्हाला कर्ज हस्तांतरणाची प्रक्रिया सहज आणि त्वरीत पूर्ण करता येऊ शकते. (टीप- यातील लाभ बजाज मार्केटच्या नियम आणि अटीनुसारच लागू असतील, त्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे)
कर्ज हस्तांतरणाच्या सुविधा-
- कमी व्याज दर
- 20 वर्षापर्यंतची मूदत
- टॉपअपचा वापर करण्यासाठी कोणते नियम नाहीत
- कमीत कमी कागदपत्रे
- कर्ज खात्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत.
- होम लोन बॅलेंस सहज आणि त्वरीत हस्तांतरित करण्यासाठी सुरक्षित ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- होम लोन बॅलेंस ट्रान्सफर शुल्क संबंधी पूर्ण पारदर्शिता
बजाज मार्केट्ससोबत होम लोन बॅलन्स ट्रान्सफर सुविधा देणाऱ्या बँक/संस्था-
- बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
- पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
- आयसीआयसीआय बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- एलआयसी हाऊसिंग फायनान्स
- शुभम हाऊसिंग फायनान्स
- श्रीराम हाऊसिंग फायनान्स