हिंदुस्तान युनिलिव्हर (Hindustan Unilever) अर्थात HUL ने माहिती दिली आहे की त्यांनी त्यांचा आटा ब्रँड 'अन्नपूर्णा' आणि मीठ ब्रँड 'कॅप्टन कुक' विकण्यासाठी एका कंपनीसोबत करार केला आहे. हे दोन्ही ब्रँड उमा ग्लोबल फूड्स (Uma Global Foods) आणि उमा कंझ्युमर प्रॉडक्ट्सला (Uma Consumer Products) विकले जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या दोन्ही कंपन्या सिंगापूरस्थित कंपनी Reactivate Brands International च्या उपकंपन्या आहेत.
Table of contents [Show]
60 कोटींची झाली डील!
हिंदुस्तान युनिलिव्हर आपल्या निवेदनात या कराराबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु पीटीआयने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की या दोन्ही ब्रँडची विक्री 60.4 कोटी रुपयांना झाली आहे. अन्नपूर्णा आणि कॅप्टन कुक हे दोन्ही ब्रँड दोन दशकांपूर्वी भारतात लाँच करण्यात आले होते. आणि सध्या दोन्ही ब्रँडने स्वत:ची छाप पाडण्यात यश मिळवले आहे. अन्नपूर्णा आटा आणि कॅप्टन कुकने भारतीयांच्या स्वयंपाकघरात स्थान मिळवले होते. या ब्रँडच्या दूरदर्शनवरील जाहिराती देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या होत्या.
#Hindustanunilever: हिंदुस्तान यूनिलीवर ने शुक्रवार 17 फरवरी को अपने आटे और नमक के कारोबार को बेचने का ऐलान किया। HUL ने बताया कि उसने इन दोनों कारोबार को ₹60.4 करोड़ में बेचने के लिए सिंगापुर की एक कंपनी के साथ समझौता किया है।
— Moneycontrol Hindi (@MoneycontrolH) February 17, 2023
पूरी खबर?https://t.co/ZRyMd7N37j pic.twitter.com/7TgckKNqOn
दोन्ही ब्रँड का विकले गेले?
HUL ने एका निवेदनात म्हटले आहे की या दोन ब्रँडची विक्री नॉन-कोअर श्रेणीतून (Non Core Scale) बाहेर पडण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. पॅकेज्ड फूड व्यवसायात मात्र कंपनी आपला व्यवसाय सुरू ठेवणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने माहिती दिली की डील अंतर्गत कंपनी ट्रेडमार्क (Trademark), कॉपीराइट (Copyright) आणि ब्रँडशी संबंधित इतर अधिकार हस्तांतरित करेल. या दोन्ही ब्रँडला आणखी वाढवण्याची क्षमता Reactivate Brands मध्ये आहे आणि हा निर्णय दोघांसाठी फायदेशीर ठरेल, असे कंपनीने म्हटले आहे. एचयूएलच्या म्हणण्यानुसार, करार पूर्ण होईपर्यंत ते ब्रँडशी संबंधित व्यवसाय सुरूच राहतील.
HUL चा निर्गुंतवणुकीचा निर्णय ड्रेसिंग, स्क्रॅच कुकिंग आणि सूपच्या पॅकेज्ड फूड व्यवसायात वाढीचा अजेंडा समोर ठेवला आहे.HUL चे CEO आणि MD संजीव मेहता (Sanjeev Mehta) म्हणाले: "दोन दशकांपूर्वी लॉन्च केलेल्या 'अन्नपूर्णा' आणि 'कॅप्टन कूक'कडे मजबूत इक्विटी आहे. आमचे धोरणात्मक प्राधान्य आणि पोर्टफोलिओ निवडी पाहता, आम्हाला विश्वास आहे की हे ब्रँड पुन्हा सक्रिय होतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या ब्रँडची विक्री चांगली होते आहे."
मेक इन इंडियाचा फटका?
दोन्ही ब्रँड जर व्यवस्थित व्यापार करत होते तर मग ते कुणा दुसऱ्या कंपनीला विकण्याचा निर्णय का घेतला गेला अशी चर्चा सध्या सुरू आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून देशात स्वदेशी उद्योगांना लोक प्राधान्य देताना दिसतायेत. घराजवळ पिठाची गिरणी असताना आयते पीठ विकत आणण्याची गरज काय? असा विचार भारतीय ग्राहक करू लागले आहेत. भारतात गव्हाचे विक्रमी उत्पादन होत असते. आपल्या आवडीच्या गव्हाचे पीठ दळून घेण्यात लोकांनी स्वारस्य दाखवले आहे. तसेच देशी बनावटीचे मीठ इतर ब्रँडच्या तुलनेत स्वस्त मिळत असल्याने लोकांनी ब्रँडेड मीठ घेण्यातही नापसंती दर्शवली असल्याचे बघायला मिळते आहे. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या सवयीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे विशेषज्ञांचे म्हणणे आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) कंपनीचा विस्तार
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ही युनिलिव्हरची उपकंपनी आहे, जी जगातील सर्वात मोठ्या ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांपैकी एक आहे. याचे मुख्यालय मुंबई, येथे आहे आणि लीव्हर ब्रदर्स इंडिया लिमिटेड म्हणून 1933 मध्ये त्याची स्थापना झाली. HUL ही भारतातील अग्रगण्य फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) कंपन्यांपैकी एक आहे ज्यामध्ये होम केअर, पर्सनल केअर आणि खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्स यासारख्या श्रेणींमध्ये ब्रँडचा पोर्टफोलिओ आहे.
HUL च्या सुप्रसिद्ध ब्रँड्समध्ये Lifebuoy, Surf Excel, Dove, Lux, Lipton, Brooke Bond, Knorr, Pepsodent, Closeup, Axe अशा ब्रँड्सचा समावेश आहे.ही कंपनी एका विस्तीर्ण वितरण नेटवर्कद्वारे कार्य करते, ज्यामध्ये भारतातील 6.3 दशलक्ष पेक्षा जास्त किरकोळ दुकानदार समाविष्ट आहेत.
त्याच्या मुख्य व्यवसायाव्यतिरिक्त, HUL शाश्वत व्यवसाय पद्धती, सामाजिक जबाबदारी आणि समुदाय विकासातील पुढाकारांसाठी देखील ओळखले जाते. कंपनीकडे "सस्टेनेबल लिव्हिंग प्लॅन" (Sustainable Living Plan) नावाचा एक शाश्वत विकासावर आधारित कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करणे, ग्राहकांचे आरोग्य आणि कल्याण सुधारणे आणि लोकांचे जीवनमान वाढवणे हे आहे. HUL जलसंधारण, आरोग्य आणि स्वच्छता आणि शिक्षण यासारखे विविध समुदाय विकास कार्यक्रम देखील चालवते.
सप्टेंबर 2021 पर्यंत, HUL चे बाजार भांडवल सुमारे $80 अब्ज इतके होते आणि ती भारतातील सर्वात श्रीमंत कंपन्यांपैकी एक होती. आर्थिक वर्ष 2020-21 साठी त्याचे उत्पन्न रु. 42,126 कोटी आणि निव्वळ नफा रु. 7,954 कोटी इतका नोंदवला गेला होता.