High Interest Rate Scheme: उद्याच्या उज्वल भविष्यासाठी आज केलेली आर्थिक गुंतवणूक ही फार महत्त्वाची ठरते. त्यासाठी योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे गरजेचे आहे. सरकारी योजनेत गुंतवलेले पैसे अधिक सुरक्षित मानले जातात. कारण त्याची हमी स्वतः सरकार घेते. सरकार कडून अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये सर्वात जास्त व्याजदर देण्यात येतो.
आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये मॅच्युरिटीवेळी तुम्ही गुंतवणूक केलेल्या मुद्दल रकमेपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला व्याज स्वरूपात दिली जाईल. या सरकारी योजनेचे नाव आहे, 'सुकन्या समृधी योजना'(SSY).
सुकन्या समृद्धी योजनेबद्दल जाणून घ्या
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरु केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) पालक 10 वर्षाच्या आतील मुलींच्या नावाने गुंतवणूक करू शकतात आणि मुलीच्या उच्च शिक्षणासाठी (Higher Education) किंवा लग्नासाठी (Wedding) मोठा फंड तयार करू शकतात.ही गुंतवणूक 15 वर्ष सलग करावी लागते. त्यानंतर 5 वर्षाचा वेटिंग पिरिअड देण्यात येतो. या काळात गुंतवणूक करावी लागत नाही. विशेष म्हणजे या कालावधीत देखील ग्राहकांना व्याजदर मिळतो.
हा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर 21 वर्षांनंतर यातील पैसे त्या मुलीला मिळतात. या खात्यातील पैसे पालक मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षी शिक्षणासाठी काढू शकतात. मुलीच्या शिक्षणासाठी पालक एकूण रकमेपैकी 50% रक्कम काढू शकतात. या योजनेत सध्या 8% व्याजदर देण्यात येत आहे. यामध्ये मुलीच्या नावे किमान 250 रुपये, तर कमाल 1.50 लाख रुपये वार्षिक गुंतवणूक करता येते.
मुद्दल रकमेपेक्षा जास्त व्याज मिळेल
तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) वार्षिक 1.5 लाखांची गुंतवणुक करायला सुरुवात केली, तर groww च्या कॅलक्युलेटर नुसार तुमची एकूण गुंतवणूक 22 लाख 50 हजार रुपये होईल. ही तुमची मुद्दल रक्कम असेल. या गुंतवणुकीवर 8% च्या हिशोबाने 44 लाख 84 हजार 534 रुपये व्याज मिळेल. थोडक्यात मॅच्युरिटीवेळी पालकांना एकूण 67 लाख 34 हजार 534 रुपये मिळतील. ज्याचा वापर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी करता येऊ शकतो.
कर सवलत घेता येईल का?
इन्कम टॅक्स कायदा 1961 अनुसार कलम 80C अंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेत 1.50 लाखांच्या वार्षिक गुंतवणुकीवर ग्राहकांना कर सवलतीचा लाभ (Tax Benefit) घेता येतो.