रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ (RBI Repo Rate Increase) केल्यानंतर अनेक खासगी आणि सरकारी बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदरात (FD Rate Increase) वाढ केली आहे. आपण सर्वच जण चार पैसे बचत स्वरूपात साठायला लागल्यावर त्या पैशांना गुंतववण्याचा विचार करतो. हल्ली गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र बँकेतील एफडी (FD) हा खूप वर्ष जुना आणि लोकांचा विश्वास असणारा पर्याय म्हणून ओळखला जात आहे.
रेपो दरात वाढ झाल्यानंतर अनेक स्मॉल फायनान्स बँकांनी (Small Finance Bank) त्यांच्या व्याजदरात 9 % पर्यंत वाढ केली आहे. बँकेतील सामान्य बचत खात्यावरील व्याजदरापेक्षा एफडीवरील व्याजदर हे जास्त असल्याने बहुसंख्य लोकांचा कल हा एफडीकडे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला कोणत्या खासगी बँका (Private Bank) एफडीवर 9 % पर्यंत व्याजदर देतात, ते जाणून घेऊयात.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक
खासगी क्षेत्रातील उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (Utkarsh Small Finance Bank) आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना 9 % पर्यंत व्याजदर देत आहे. 700 दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना बँकेकडून 8.25 % व्याजदर दिले जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना बँक 700 दिवसांच्या एफडीवर 9 % व्याजदर देत आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार बँक 701 दिवस ते 5 वर्षाच्या कालावधीतील एफडीसाठी सामान्य ग्राहकांना 7.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.25% व्याजदर देत आहे.
इक्विटास स्मॉल फायनास बँक
इक्विटास स्मॉल फायनास बँक (Equitas Small Finance Bank) ही देखील त्यांच्या ग्राहकांना एफडीवरील गुंतवणुकीस 9 % व्याजदर देत आहे. बँक सामान्य ग्राहकांना 888 दिवसांसाठी 8.50% व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना समान कालावधीसाठी 9 % व्याजदर देते. यासोबतच बँक 889 दिवस ते 3 वर्षाच्या कालावधीतील एफडी गुंतवणुकीसाठी सामान्य ग्राहकांना 8 % तर ज्येष्ठ नागरिकांना 8.50 % व्याजदर देत आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank) देखील त्यांच्या ग्राहकांना एफडीवर आकर्षक व्याजदर देऊन ग्राहकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देत आहे. बँक 1001 दिवसाच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 9% व्याजदर देत आहे. तर समान कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 9.50% व्याजदर देत आहे.
याशिवाय 501 दिवसाच्या एफडीवर ग्राहकांना 8.75% व्याजदर आकारले जात आहे.तर ज्येष्ठ नागरिकांना समान कालावधीसाठी 9.25% व्याजदर दिले जात आहे.
Source: moneycontrol.com