• 27 Sep, 2023 01:17

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top-Paid Bank CEOs: हे आहेत भारतातील सर्वाधिक पगार घेणारे बँकिंगमधील सीईओ

Top-Paid Bank CEO

Image Source : www.tribuneindia.com

Top-Paid Bank CEOs: सॅलरी हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. म्हणजे कोणाला किती पगार मिळतो. हे जाणून घेण्यात प्रत्येकाला इंटरेस्ट असतो. त्यात जे मोठमोठ्या पदावर असतात. त्यांचे पगार ऐकून काही वेळेस विश्वासच बसत नाही. पण प्रत्यक्षात त्यांना तितका पगार असतो. तर आज आपण बँकिंग सेक्टरमधील बँकेच्या सीईओंचे पगार जाणून घेणार आहोत.

सॅलरी हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. म्हणजे कोणाला किती पगार मिळतो. हे जाणून घेण्यात प्रत्येकाला इंटरेस्ट असतो. त्यात जे मोठमोठ्या पदावर असतात. त्यांचे पगार ऐकून काही वेळेस विश्वासच बसत नाही. पण प्रत्यक्षात त्यांना तितका पगार असतो. तर आज आपण बँकिंग सेक्टरमधील बँकेच्या सीईओंचे पगार जाणून घेणार आहोत.

शशीधर जगदिशन (MD & CEO HDFC Bank)

2023 या आर्थिक वर्षात सर्वाधिक पगार घेणारे बँकेचे सीईओ म्हणून शशीधर जगदिशन यांचे नाव घेतले जाते. त्यांचा या वर्षातील पगार 10.55 कोटी रुपये इतका आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी त्यांच्या पगारात 62 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. शशीधर जगदिशन यांच्यापूर्वी अदित्य पुरी हे एचडीएफसी बँकेचे सीईओ होते. शशीधर हे सायन्स शाखेचे पदवीधर असून ते क्वॉलिफाईड सीए आहेत. त्यांनी इकॉनॉमिक्स ऑफ मनी, बँकिंग आणि फायनान्समध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे.

अमिताभ चौधरी (CEO Axis Bank)

शशीधर यांच्यानंतर अॅक्सिस बँकेचे सीईओ अमिताभ चौधरी हे दुसरे सर्वाधिक पगार घेणारे बँकर्स आहेत. त्यांना 2023 या आर्थिक वर्षासाठी 9.75 कोटी रुपये पगार मिळतो. अमिताभ चौधरी यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सायन्समधून इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे. तर आयआयएम अहमदाबाद येथून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

संदीप बक्षी (CEO ICICI Bank)

आयसीआयसीआय बँकेचे सीईओ संदीप बक्षी यांना 2023 वर्षासाठी 9.60 कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. बक्षी हे 1986 पासून आयसीआयसीआय ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. 2002 मध्ये ते आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स शाखेचे ते एमडी आणि सीईओ होते. त्यानंतर ते बँकेचे चीफ ऑफरेटिंग ऑफिसर (COO) म्हणून आणि नंतर आयसीआयसीआय बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून काम पाहू लागले. यावर्षी त्यांच्या पगारात 35 टक्क्यांनी वाढ करण्यात आली.

बक्षी यांनी चंदीगढमधील पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. जमशेदपूरमधील झेव्हिअर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट डिग्री मिळवली आहे.