• 27 Mar, 2023 05:27

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Car Insurance Benefit: ऑनलाईन कार इन्शुरन्स घेण्याचे 'हे' आहेत 5 फायदे

Online Car Insurance

Online Car Insurance Benefit: तुम्हालाही कार इन्शुरन्स घ्यायचा आहे, पण समजत नाहीए की, ऑनलाईन घेऊ की ऑफलाईन, तर आत्ताच ऑनलाईन कार इन्शुरन्स घेण्याचे 5 फायदे जाणून घ्या.

हल्ली प्रत्येकाच्याच घरी चारचाकी गाडी पाहायला मिळते. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचे असेल, तर अशावेळी कारची खूप मदत होते. लोकांच्या याच गरजेचा विचार करून गेल्या काही वर्षांमध्ये कार इन्शुरन्स (Car Insurance) वेगवेगळ्या कंपन्यांनी द्यायला सुरुवात केली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही कार इन्शुरन्स खरेदी करू शकता. पण हल्लीच्या धावपळीमुळे आणि कमी वेळात जलद गतीने सेवा उपलब्ध असल्याने, अनेक जण ऑनलाईन पद्धतीने कार इन्शुरन्स (Online Car Insurance)घेण्यासाठी प्राधान्य देतात. ऑनलाईन कार इन्शुरन्स घेण्याचे कोणते फायदे आहेत, ते या निमित्ताने जाणून घेऊयात.  

ऑनलाईन कार इन्शुरन्स घेण्याचे फायदे पुढीलप्रमाणे-

एकावेळी कार इन्शुरन्सची तुलना करणं  शक्य

तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने कार इन्शुरन्स खरेदी करणार असाल, तर कार इन्शुरन्स सेवा पुरवणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. याचा फायदा असा की, तुम्ही सर्व कार इन्शुरन्सची तुलना करून कोणता कार इन्शुरन्स बेस्ट आहे, हे तपासू शकता. ही तुलना वेगवेगळ्या घटकांनी केली जाऊ  शकते. ज्यामध्ये किंमत, सेवा इ. मुद्दे समाविष्ट असतील.

वेळेची बचत होते

हल्ली आपण सगळेच वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतलेलो असतो. त्यामुळे आपल्याकडून अशी छोटी कामं राहून जाऊ शकतात. ऑनलाईन कार इन्शुरन्स तुम्ही घरबसल्या एका क्लिकवर खरेदी करू शकता. यामुळे वेळ आणि पैसा अशा दोन्ही गोष्टींची बचत होते. अगदी काही मिनिटात तुम्हाला हा कार इन्शुरन्स मिळतो. सध्या अनेकजण ऑनलाईन कार इन्शुरन्स काढून देतं, स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरु करत आहेत.

कमीत कमी कागदपत्रं

ऑनलाईन कार इन्शुरन्स काढण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असते. बऱ्याशाच कंपन्या कोणतेही कागदपत्रं न घेता देखील कार इन्शुरन्स काढून देतात. हा कार इन्शुरन्स काढण्यासाठी सुरुवातीला एक अर्ज भरून द्यावा लागतो. आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी विमा कंपनीला जमा करावी लागते. पॉलिसी जारी केल्यानंतर पॉलिसी कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाते. थोडक्यात काय तर, कार विम्याच्या ऑनलाईन खरेदीसाठी तुम्हाला अनेक फॉर्म भरण्याची गरज नाही.

एकाच वेळी वेगवेगळ्या सुविधा आणि डिस्काउंट

ऑनलाईन कार इन्शुरन्ससाठी तुम्हाला ऑनलाईन ग्राहक सेवा देखील प्रदान केली जाते. ही सेवा पॉलिसीधारकांना नेहमी उपलब्ध असते. धोरणाशी संबंधित सर्व माहिती या सेवेमध्ये दिली जाते. यासह, त्यामध्ये आवश्यक कागदपत्रांची आपल्याला संपूर्ण माहिती देखील मिळते. 
आपण ऑनलाईन कार इन्शुरन्स खरेदी करता तेव्हा कोणत्याही दलाल किंवा एजंटला पैसे द्यावे लागत नाहीत. ऑनलाईन कार इन्शुरन्स कंपन्या थेट ग्राहकांना सूट देतात. तुम्ही ऑटोमोबाईल असोसिएशनचे सदस्य असल्यास किंवा तुमच्या वाहनमध्ये एंटी-थेफ्ट डिवाइस असेल, तर कार इन्शुरन्स कंपनी अतिरिक्त सूट देते.

रिन्यू सिस्टम साधी आणि सोपी प्रक्रिया

तुम्हाला चांगले ठाऊक असेल की, कोणतेही सरकारी कागदपत्र नूतनीकरण करण्यासाठी लोकांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागतात. परंतु ऑनलाईन कार इन्शुरन्सच्या बाबतीत आपल्याला याची आवश्यकता भासणार नाही. महत्त्वाचं म्हणजे पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी, ग्राहकाला पुन्हा फॉर्ममध्ये पूर्ण माहिती भरावी लागणार नाही. याचे कारण, आपली संपूर्ण माहिती पहिल्यांदाच ऑनलाईन संग्रहित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आपण ट्रान्झॅक्शनसाठी डिजिटल मोड वापरू शकता