खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेला एप्रिल ते जून या तिमाहीत 11951 कोटींचा नफा झाला आहे. बँकेच्या नफ्यात वार्षिक आधारावर 30% वाढ झाली. बँकेला गेल्या वर्षी याच तिमाहीत 9196 कोटींचा नफा झाला होता.
एचडीएफसीला विलीन केल्यानंतर एचडीएफसी बँकेने पहिल्यांदाच आर्थिक निकाल जाहीर केला. बँकेने आज सोमवारी 17 जुलै 2023 रोजी पहिल्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार पहिल्या तिमाहीत बँकेच्या नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये 21.1% वाढ झाली आहे. बँकेला 23599.1 कोटींची व्याजातून मिळाले. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला 19481.4 कोटी मिळाले होते.
बँकेचे कोअर इंटरेस्ट मार्जिन 4.1% असून इंटरेस्ट अर्निंग असेट 4.3% इतके आहे. 30 जून 2023 अखेर बँकेने बुडीत कर्जांसाठी 2860 कोटींची तरतूद केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तरतूद कमी राहिली.
पहिल्या तिमाहीत बुडीत कर्जाचे प्रमाण कमी झाले आहे. जूनअखेर बँकेचे ग्रॉस एनपीएस प्रमाण 5.7% असून ते 19045.1 कोटी इतके आहे. नेट एनपीए 9.4% इतके आहे. बँकेचे एकूण कर्ज वितरण 30 जून 2023 अखेर 1615672 कोटींपर्यंत वाढले आहे. त्यात 15.8% वाढ झाली. भांडवलाचे प्रमाण 18.9% इतके आहे.
ठेवींमध्ये झाली मोठी वाढ
बँकेच्या ठेवींमध्ये पहिल्या तिमाहीत मोठी वाढ झाली आहे. 30 जून 2023 अखेर एचडीएफसी बँकेकडे एकूण 1913096 कोटींच्या ठेवी आहेत. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.2% वाढ झाली. याशिवाय CASA खात्यातील ठेवींमध्ये 10.7% वाढ झाली असून हा यात बचत खात्यातीत ठेवींचा आकडा 560604 कोटींवर गेला आहे. चालू खात्यातील एकूण ठेवी 252350 कोटींवर आहेत.
शेअरमध्ये तेजी दिसून आली
तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात एचडीएफसी बँकेचा शेअरमध्ये तेजी दिसून आली. इंट्राडेमध्ये शेअर 1682.05 रुपयांपर्यंत गेला होता. दिवसअखेर एचडीएफसी बँकेचा शेअर 2.07% तेजीसह 1679.20 रुपयांवर बंद झाला.