UPI च्या वापरामुळे डिजिटल पेमेंटची सुविधा अधिक सोपी आणि जलद झाली आहे. भारतातील सर्वसामान्य नागरिक देखील आता युपीआयचा वापर करून क्षणात पैशाची देवाण घेवाण करत आहे. दरम्यान, आता युपीआय आधारित व्यवहाराच्या सुविधेमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. ज्या प्रमाणे आता युपीआयचा वापर करून एटीएममधून पैसे काढता येऊ लागले आहेत. तसेच आता IVR कॉलिंग म्हणजेच फोन कॉलच्या माध्यमातून देखील पेमेंट करता येत आहे. दरम्यान, HDFC बँकेने सुरू नुकतेच UPI आधारित डिजिटल पेमेंटच्या 3 नवीन सुविधा सुरू केल्या आहेत.
खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने 20 सप्टेंबरला UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) वर आधारित डिजिटल पेमेंट सुविधा देणाऱ्या 3 नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये UPI 123Pay ही IVR ( interactive voice response)कॉलिंगद्वारे पेमेंट सुविधा, तसेच व्यावसायिक पेमेंटसाठी UPI प्लग-इन ही सेवा आणि QR पेमेंटसाठी ऑटोपे ही सुविधा लॉन्च केली आहे.
UPI 123Pay IVR कॉलिंग
युपीची 123 पे ही IVR कॉलिंगवर आधारित पेमेंट सुविधा आहे. यापूर्वी पंजाब नॅशनल बँकेने देखील सुविधा सुरू केली आहे. आता एचडीएफसी बँकेकडून ही सुविधा सुरू करण्यात येत आहेत. या सुविधेच्या माध्यमातून युजरला आता थेट मोबाईल फोनवरून इंटरनेट कनेक्शनशिवाय डिजिटल पेमेंट करता येणार आहे.
UPI प्लग-इन
याच बरोबर एचडीएफसी बँकेने आता UPI प्लग-इन ही सेवा देखील सुरू केली आहे. यामाध्यमातून पेमेंट करताना ग्राहकांना वेगवेगळ्या अॅपवर स्विच होण्याची गरज नाही.
युपीच्या माध्यमातून ऑटो-पे
याच बरोबर बँकेने आता UPI च्या माध्यमातून पेमेंट करत असताना ऑटो पेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये युजर्सना नियमित मासिक पेमेंट शेड्यूल करण्यासाठी उपयुक्त ठरते.यासाठी युजरने देय रक्कम निश्चित केलेल्या तारखेला युपीआयच्या माध्यमातून दिली जाईल. यासाठी तुमच्या पेमेंटची पावती देखील तुम्हाला प्राप्त होईल.