Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC Credit Card : क्रेडिट कार्डच्या माध्यमातून UPI वर 500 कोटींचे व्यवहार; HDFC ठरली पहिली बँक

UPI

UPI वर एचडीएफसी बँकेच्या रुपे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे 500 कोटी रूपयांचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. 500 कोटींचा टप्पा गाठणारी ही पहिलीच बँक ठरली असल्याचे National Payments Corporation of India (NPCI) ने म्हटले आहे.

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे हे एकत्रीकरण झाल्यानंतर HDFC ही बाजार मुल्यानुसार भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी ठरली होती. दरम्यान, बँकिंग क्षेत्रामध्ये या बँकेने UPI च्या वापरा संदर्भात एक अव्वल दर्जाची कामगिरी पार पाडली आहे.  UPI वर एचडीएफसी बँकेच्या रुपे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे 500 कोटी रुपायांचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. 500 कोटींचा टप्पा गाठणारी ही पहिलीच बँक ठरली असल्याचे National Payments Corporation of India (NPCI) ने म्हटले आहे.

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून युपीआयचा वापर

भारतात झटपट पैशाचे व्यवहार करण्यासाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आतातर भारताबाहेरही जवळपास 13 देशांनी UPI चा स्वीकार केला आहे. युपीआयचा वाढता वापर पाहून बँकांनी ग्राहकांना सुविधा देण्यास सुरुवात केली. त्यानुसार 2022 मध्ये काही बँकांकडून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून युपीआय वापरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी ग्राहकांना आपल्या डेबिट कार्डसोबत युपीआय लिंक करून त्याचा वापर करता येत होता. मात्र क्रेडिट कार्डचाही वापर करून युपीआयच्या माध्यमातून व्यवहार करण्याची सुविधा एचडीएफसी बँकेने  (HDFC Bank)उपलब्ध करुन दिली आहे.

एचडीएफसी रुपे क्रेडिट कार्ड HDFC Rupay Credit Card

बहुतांश वेळा युपीआय सुविधेचा वापर हा आपल्या डेबिट कार्डचा वापर करून करण्यात येतो. मात्र HDFC बँकेकडून ग्राहकांसाठी युपीआय रुपे क्रेडिट कार्डची  (UPI Rupay Credit Card) सेवा सुरू करण्यात आली आहे. हे कार्ड व्हर्चुअल स्वरुपात उपलब्ध असून हे कार्ड युपीआयला लिंक केल्यानंतर ग्राहक क्यूआर कोड स्कॅनिंगच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकतात. तसेच ग्राहकांना हे युपीआय रुपे कार्ड (UPI Rupay Credit Card) ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून देखील वापरता येते. हे कार्ड मिळवण्यासाठी बँकेकडून 250 रुपये फी आकारण्यात येते.

500 कोटींचे व्यवहार

एचडीएफसी बँकेच्या रुपे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून  UPI वर तब्बल 500 कोटी रुपयांचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. डेबिट कार्डच्या माध्यमातून UPI वर व्यवहार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र क्रेडिटच्या माध्यमातून 500 कोटींच्या व्यवहाराचा टप्पा गाठणारी HDFC ही पहिलीच बँक ठरली आहे. या संदर्भात NPCI ने ट्विट करून एचडीएफसी बँकेचे अभिनंदन केले आहे.