स्मॉल कॅप (Small cap) कंपनी हॉकिन्स कुकर्सनं (Hawkins Cookers) आपल्या गुंतवणूकदारांना एक चांगला परतावा आणि प्रत्येक शेअरमागे तब्बल 100 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. हॉकिन्स कुकर या कंपनीचं एकूण बाजार भांडवल (Market capitalization) 3,535.12 कोटी रूपये इतकं आहे. शुक्रवारी (21 जुलै) बाजार बंद झाल्यानंतरची ही आकडेवारी आहे. व्यवसाय वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांसाठी या लाभांशाची घोषणा केली. 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यावर 100 रुपये लाभांश (Dividend) देण्याचं बोर्डाच्या बैठकीत जाहीर करण्यात आलं. आता याबाबतचा निर्णय कंपनी घेणार आहे.
ऑगस्टमध्ये जाहीर करणार लाभांश?
आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल कंपनी येत्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये साधारणपणे 9 तारखेला जाहीर करणार आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचं वार्षिक आधारावरचं उत्पन्न 6.61 टक्क्यांनी वाढून 271.83 कोटी रुपये झालं आहे. नफ्याचा विचार केला तर वार्षिक आधारावर कंपनीचा नफा 6.69 टक्क्यांनी वाढला आहे. 22.80 कोटी रुपये इतका कंपनीला नफा झाला आहे. मागच्या व्यावसायिक वर्षाच्या संदर्भात हॉकिन्स कुकर्सचं उत्पन्न 958.01 कोटी रुपयांवरून 1,005.79 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचं दिसत आहे. या कालावधीत कंपनीचं उत्पन्न 83.89 कोटी रुपयांवरून 94.78 कोटी रुपये इतकं झालं आहे.
स्टॉकची स्थिती काय?
मागच्या सहा महिन्यांचा विचार केल्यास हॉकिन्स कुकर्सच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्तनं वाढ नोंदवण्यात आली आहे. 21 जुलै 2023ला मुंबई शेअर बाजारात हा शेअर 6,690 रुपयांवर बंद झाला. या शेअरनं गुंतवणूकदारांनाही खूश केलं आहे. जवळपास 7 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा या शेअरनं दिला आहे. मागच्या एक वर्षाची कामगिरीही पाहू. या शेअरनं वर्षभराच्या कालावधीत गुंतवणूकदारांना 22 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. 52 आठवड्यांचा या शेअरचा उच्चांक आकड्यात पाहता येईल. हा उच्चांक 6,720 रुपये प्रति शेअर बोता. तर नीचांक 5,199.80 रुपये प्रति शेअर नोंदवला गेला आहे.
वर्ष आणि शेअरची किंमत
शेअरची कामगिरी पाहायची झाल्यास मागच्या 20 वर्षांचा आढावा घ्यावा लागेल. 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 जुलै 2003ला हा शेअर 21.40 रुपये प्रति शेअर होता. तर कंपनीचे 4,672 शेअर्स सुमारे 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध होते. एवढे शेअर खरेदी केल्यानंतर जर कोणता शेअर या स्टॉकमध्ये गुंतवलेला राहत असेल तर त्याचं एकूण मूल्य 3.12 कोटी रुपये झालं आहे. एकूणच कंपनीच्या या कामगिरीनंतर गुंतवणूकदारांना त्याचा लाभ मिळणार आहे. 9 ऑगस्टला कंपनी लाभांश जाहीर करण्याची शक्यता आहे.