Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

‘Happiness For All’ Investment Fraud: दुप्पट रिटर्न्सचे आमिष, 24 गुंतवणूकदारांची 88 लाख रुपयांना फसवणूक

Investment Fraud, Investment,

‘Happiness For All’ Investment Fraud In Mumbai: शेअर्स तसेच इतर पर्यायी साधनांमध्ये गुंतवणुकीतून मोठे रिटर्न्स देण्याचे आमिष दाखवत मुंबईतील 24 गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार उघडीस आला आहे. या प्रकरणी बोरिवलीत गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.

शेअर बाजारात गुंतवणूक करुन त्यातून  मिळवण्याचे आमिष गुंतवणूकदारांना चांगलेच महागात पडले आहे. 'हॅपीनेस फॉर ऑल' या नावाने जाहिरातबाजी 24 गुंतवणूकदारांची 88 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उडकीस आला आहे. या योजनेचा मुख्य सूत्रधार दिपक म्हसकर याच्याविरोधात बोरिवलीत गुन्हा दाखल झाला आहे.

वडाळा येथील दीपक म्हसकर यांच्याबाबत माहिती दिली. म्हसकर याने  'हॅपीनेस फॉर ऑल' या योजनेतून सामान्य गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले आहेत. याकरिता म्हसकर याने बोरिवलीत ऑफिस थाटले होते. हे पैसे शेअर आणि इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक त्या बदल्यात चांगले रिटर्न्स मिळतील असे आश्वासन म्हसकर याने गुंतवणूकदारांना दिले होते. दोन लाख रुपये दिल्यास साडे तीन महिन्यात तीन लाख रुपये मिळतील, असे आमिष म्हसकरने या सर्व गुंतवणूकदारांना दाखवले होते. त्याच्या भूलथापांना बळी पडून जवळपास 24 गुंतवणूकदारांनी  'हॅपीनेस फॉर ऑल' मध्ये गुंतवणूक केली आहे.  

एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या श्रीवल्लभ जोशी यांना त्यांच्या परिचयातील व्यक्तीने 'हॅपीनेस फॉर ऑल' या योजनेबद्दल माहिती सांगितली होती. योजना चालविणाऱ्या यांच्या बोरिवली येथील कार्यालयात जाऊन श्रीवल्लभ यांनी या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेतली. दोन लाख रुपये गुंतविल्यास साडेतीन महिन्यांत तीन लाख रुपये मिळतील असे म्हसकर यांनी सांगितले. श्रीवल्लभ यांनी या योजनेत गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आणि दोन लाख रुपये धनादेशातून म्हसकर यांना दिले. याबदल्यात म्हसकर याने नोटरी केलेला करारनामा आणि एक पावती दिली होती. 

साडेतीन महिने पूर्ण झाल्यानंतर श्रीवल्लभ यांनी म्हसकरला गुंतविलेल्या पैशाबाबत विचारणा केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे आणि नंतर त्याने फोनच घेणे बंद केले. म्हसकर याने आपली रक्कम अन्य कुठे गुंतवली याची माहिती घेण्यासाठी श्रीवल्लभ याने कार्यालय गाठले असता ते बंद आढळले. त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार म्हसकर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 'हॅपीनेस फॉर ऑल' या योजने इतर 23 जणांनी गुंतवणूक केली आहे. यातून जवळपास 88 लाखांची फसवणूक झाली आहे.

गुंतवणूकदारांनो खबरदारी घ्या

  • शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून नेमका किती रिटर्न मिळेल याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबीने अधिकृत केलेले किंवा सेबी रजिस्टर्ड फायनान्शिअल अॅडव्हायझर यांचा सल्ला घेणे योग्य आहे.
  • कोरोनानंतर छोट्या मोठ्या बेकायदा गुंतवणूक योजनांचा सुळसुळाट झाला आहे. या योजना चालवणाऱ्यांकडे सेबी किंवा रिझर्व्ह बँकेची कोणतीही परवानगी नसते.
  • अशा प्रकारच्या योजना बहुतांशवेळा मोठे रिटर्न्स , दाम दुप्पट करणे अशी स्वप्ने दाखवतात. प्रत्यक्षात असे काही होत नाही. त्यामुळे अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळा.
  • अनेकदा अशा पॉन्झी स्कीम चालवणारे गुंतवणूकदारांना फसवण्यासाठी त्यांच्या मित्र परिवार, नातेवाईक यांच्यातील जवळच्या व्यक्तींचा हाताशी धरतात किंवा त्यांना पार्टनर बनवतात. ज्यामुळे गुंतवणूकादारांना जाळ्यात ओढणे सोपे जाते.
  • रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय कोणतीही व्यक्ती किंवा कंपनी नागरिकांकडून पैसे गोळा करु शकत नाही. असे कोणी करत असेल तर कायदेनुसार गैर आणि नियमबाह्य आहे.