गॅरंटीड रिटर्न प्लॅन म्हणजे डबल धमाकाच आहे. कारण, एकाचवेळी तुम्हाला बचत ही करता येते आणि लाईफ इन्शुरन्स ही मिळतो. तुम्ही मार्केटमध्ये जर इन्शुरन्ससह सुरक्षित रिटर्न शोधत असाल तर तुमच्यासाठी गॅरंटीड रिटर्न प्लॅन खास ठरणार आहे. पण, त्याआधी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
गॅरंटीड रिटर्न प्लॅन का आहे खास?
बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या अनेक फायद्यांसह तुम्हाला नियमित रिटर्न आणि लाईफ इन्शुरन्स कव्हर देतात. ही कमी रिस्क असेलेली इन्शुरन्स प्रोडक्ट्स आहेत जी एका विशिष्ठ मुदतीसाठी गुंतवणुकीवर निश्चित रिटर्नची हमी देते. गॅरंटीड रिटर्न प्लॅनअंतर्गत पॉलिसी धारक प्लॅनच्या अवधीत मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर निश्चित प्रीमियम भरू शकतात. मॅच्युरिटीनंतर गुंतवणुकदाराला गॅरंटीड बोनससह एकठोक रक्कम मिळू शकते. तसेच, गॅरंटीड रिटर्नबरोबरच पॉलिसीच्या अवधीत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनींना इन्शुरन्सची एकूण रक्कमही मिळू शकते.
गॅरंटीड रिटर्न प्लॅनचे फिचर्स
- प्लॅन गुंतवणुकदारांना ठरलेल्या अवधीनुसार एकठोक, अल्पकालीन, दीर्घकालीन किंवा भविष्यात तत्काळ उत्पन्नाच्या स्वरूपात गॅरंटीड उत्पन्न देते.
- गुंतवणुकदार रिटर्नच्या बाबतीत सुलभता मिळवू शकतात. कारण, ते एकठोक रक्कम किंवा मासिक किंवा वार्षिक आधारावर निश्चित उत्पन्न मिळवण्यासाठीचा पर्याय निवडू शकतात.
- गुंतवणुकदाराने एंडोव्हमेंट प्लॅन निवडल्यानंतर, त्यांना अतिरिक्त फायदे मिळतील जे दरवर्षी जमा केले जातात.
- नियमित उत्पन्नाशिवाय, गॅरंटीड रिटर्न प्लॅन लाईफ इन्शुरन्स कव्हरही देते.
- कव्हरेज वाढवण्यासाठी गुंतवणुकदार पर्यायी रायडर्स किंवा अॅड-ऑन ही जोडू शकतात.
- याशिवाय अनेक गॅरंटीड रिटर्न प्लॅन भरलेल्या प्रीमियमवर टॅक्सचा लाभ ही देतात.
प्लॅन खरेदी करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा
सर्वात आधी आपण आपली आर्थिक ध्येय पाहणे गरजेचे आहे. तसेच, गॅरंटीड रिटर्न प्लॅन खरेदी करण्यापूर्वी आपण वयाच्या कोणत्या टप्प्यात आहोत आणि कशासाठी बचत करत आहोत. याचा विचार करणेही क्रमप्राप्त आहे. याशिवाय ज्यांना कोणत्याच रिस्कविना रिटर्न मिळवायचा आहे. ते गॅरंटीड रिटर्न प्लॅन खरेदी करु शकतात.
याचबरोबर लॉक-इन अवधीसह येणाऱ्या लाॅन्ग टर्म प्लॅनच्या शोधात असलेले गुंतवणुकदार आपले पैसे गॅरंटीड रिटर्न प्लॅनमध्ये गुंतवू शकतात. कारण यामुळे दीर्घ काळासाठी निश्चित उत्पन्नाचा प्रवाह तयार व्हायला मदत होणार आहे.
तसेच, ज्यांच्याजवळ संयम आहे आणि ते रिटायरमेंटसाठी पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्यासाठी देखील हा प्लॅन खास ठरणार आहे. जे गुंतवणुकदार अधिक रिटर्नपेक्षा स्थिरतेला प्राधान्य देतात, त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी गुंतवणूक करणे योग्य ठरणार आहे.