Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Green Bonds: केंद्र सरकार ग्रीन बॉंड्सबाबत घेणार मोठा निर्णय, गुंतवणूकदारांना करावी लागणार प्रतीक्षा

Green Bonds

Image Source : www.asiaasset.com

Green Bonds: मागील वर्षभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. महागाई कमी करण्यासाठी जगभरातील सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढ केली होती. यामुळे बॉंडयिल्ड कमी झाली. बॉंड मार्केटची झळाळी कमी झाल्याने यातील गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे.

केंद्र सरकारकडून ग्रीन बॉंड्सबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकारकडून चालू आर्थिक वर्षात ग्रीन बॉंड्समधून 15000 ते 16000 कोटी उभे करण्याचे नियोजन होते, मात्र हा प्रस्ताव तूर्त स्थगित करण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. यामुळे गुंतवणूकदारांना ग्रीन बॉंडमध्ये गुंतवणूक करण्याबाबत आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

मागील वर्षभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. महागाई कमी करण्यासाठी जगभरातील सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढ केली होती. यामुळे बॉंडयिल्ड कमी झाली. बॉंड मार्केटची झळाळी कमी झाल्याने यातील गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे.

ग्रीन बॉंडमधून गुंतवणूकदारांना जादा परताव्याची अपेक्षा आहे, मात्र बॉंड यिल्डमध्ये मागील काही महिन्यांपासून सातत्याने घसरण होत असल्याने सरकार चिंतेत आहे. ग्रीन बॉंडमधून मिळणारा कुपन रेट किंवा परतावा हा सरासरी 7.10% इतका आहे.

रिझर्व्ह बँकेने जानेवारी 2023 मध्ये 8000 कोटींचे ग्रीन बॉंड इश्यू केले होते. पाच वर्ष मुदतीच्या ग्रीन बॉंडचा कुपन रेट हा इतर सरकारी रोख्यांच्या तुलनेत 0.05 ते 0.06% ने कमी होता. इतर सरकारी रोख्यांच्या तुलनेत ग्रीन बॉंडची यिल्ड कमी होत असल्याने तूर्त चालू वर्षातील ग्रीन बॉंडचे इश्यू स्थगित केले जाऊ शकतात, असे सूत्रांनी म्हटले आहे.

आता मागील सात महिन्यात बॉंड यिल्ड कमी झाली आहे. त्यामुळे नव्याने ग्रीन बॉंड इश्यू करायचे झाल्यास 7% खाली कूपन रेट असू शकतो. इतक्या कमी बॉंड यिल्डमुळे गुंतवणूकदार प्रतिसाद देतील का याबाबत सरकार साशंक आहे.  

वीज उत्पादक कंपन्यांसाठी Green Bonds ठरलेत संजीवनी

  • वीज उत्पादक कंपन्यांसाठी ग्रीन बॉंड्स संजीवनी ठरले आहेत. 
  • एका अहवालानुसार वर्ष 2014 पासून वीज उत्पादकांनी ग्रीन बॉंडमधून 43 बिलियन डॉलर्सचा निधी उभारला आहे.  
  • स्थानिक वीज उत्पादक कंपन्यांनी ग्रीन बॉंड इश्यू करण्यात मोठा वाटा उचलला आहे. 
  • 2014 ते मार्च 2023 या काळात इश्यू करण्यात आलेल्या ग्रीन बॉंड्समध्ये 80% वाटा स्थानिक कंपन्यांचा आहे. 
  • यात ग्रीन्को, ReNew आणि कंटिनम या कंपन्या ग्रीन बॉंडमध्ये आघाडीवर आहेत. 
  • अपारंपारिक ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक भांडवलाची गरज ग्रीन बॉंडमधून भागवण्यात आली. 
  • वर्ष 2021 या एका वर्षात सर्व प्रकारच्या ग्रीन बॉंड्समधून 9.5 बिलियन डॉलर्सचा निधी उभारण्यात आला. 
  • सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून देखील ग्रीन बॉंड इश्यू करण्यात आले आहेत. 
  • यात IREDA, NHPC, NTPC या कंपन्यांनी मध्यम कालावधीचे ग्रीन बॉंड इश्यू केले.