Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Scam on Twitter: ट्विटरवर Paytm चा मेसेज आलाय? सावधान! होऊ शकते तुमची फसवणूक

Scam on Tweeter

गेल्या काही दिवसांत, अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी बनावट ग्राहक सेवा एजंटच्या खात्याद्वारे संदेश प्राप्त झाल्याची तक्रार केली आहे. यापैकी बहुतेक वापरकर्त्यांनी तक्रार केली की त्यांनी ट्विटरवर पेटीएमला टॅग करून UPI-संबंधित समस्यांसाठी मदत मागितली होती, परंतु कंपनीच्या नावाच्या बनावट ग्राहक सेवा हँडलवरून त्यांना संदेश प्राप्त झाले आहेत.

ऑनलाईन आर्थिक घोटाळ्यांची अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांत चर्चिली जात आहेत. कधी बनावट इलेक्ट्रिसीटी बिल पाठवून, कधी बनावट कुरियर पार्सल पाठवून तर कधी युट्युबवरचे व्हिडियो लाईक करून पैसे कमावण्याची ऑफर देऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अशातच आता एक नव्या प्रकारचा स्कॅम ट्विटरवर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जाणून घेऊयात नेमके कशाप्रकारे ट्विटर वापरकर्त्यांची आर्थिक फसवणूक सायबर चोर करत आहेत.

खरे तर पेटीएम कस्टमर केअरच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांचा धंदा आता सोशल मीडियावर चांगलाच फोफावत आहे. सोशल मिडीयावर पेटीएमच्या नावाने बनावट खाते सुरु करून ग्राहकांना संपर्क साधला जातो आहे आणि त्यांच्याकडून बँकेचे तपशील,  क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर, पॅन क्रमांक आणि इतर खासगी माहिती घेऊन लोकांचे बँक खाते रिकामे होत आहे.  

असा सुरु आहे स्कॅम 

पेटीएम वापरकर्त्यांना पेटीएम वापरताना काही अडचणी आल्या तर ते कस्टमर केयरला कॉल करून त्यांची तक्रार नोंदवतात. वारंवार तक्रार करूनही पेटीएम कडून काही प्रतिसाद न मिळाल्यास त्रस्त ग्राहक थेट सोशल मिडीयाचा आधार घेत ट्विटर किंवा फेसबुकवर त्यांना होत असलेला मनस्ताप व्यक्त करतात.

पेटीएमच्या सेवेसंबंधी तक्रार करणाऱ्या ग्राहकांना सायबर चोर बनावट खाते तयार करून मेसेज करत असून त्यांच्याकडून बँक खाते आणि इतर माहिती घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत.

तुम्हाला देखील अशा प्रकारचे काही मेसेज आले असल्यास वेळीच सावध व्हा, नाही तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

गेल्या काही दिवसांत, अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी बनावट ग्राहक सेवा एजंटच्या खात्याद्वारे संदेश प्राप्त झाल्याची तक्रार केली आहे. यापैकी बहुतेक वापरकर्त्यांनी तक्रार केली की त्यांनी ट्विटरवर पेटीएमला टॅग करून UPI-संबंधित समस्यांसाठी मदत मागितली होती, परंतु कंपनीच्या नावाच्या बनावट ग्राहक सेवा हँडलवरून त्यांना संदेश प्राप्त झाले आहेत. वापरकर्त्यांनी असे स्क्रीनशॉट शेअर केले ज्यामध्ये त्यांचा UPI आयडी आणि मोबाईल नंबरची माहिती देखील समाविष्ट होती. घोटाळेबाज या माहितीचा फायदा घेत आहेत आणि लोकांना वैयक्तिकरित्या कॉल करून त्यांची फसवणूक करत आहेत.

ब्लू टिक नसल्याने वाढला त्रास

ट्विटरने आपल्या नवीन नियमांनुसार सबस्क्रिप्शनशिवाय ट्विटर खात्यांना ब्लू टिक (Blue Tick) देणे बंद केले आहे. अशा परिस्थितीत, लोकांना ट्विटरवरील खरे हँडल कोणते आणि बनावट हँडल कोणते यांतील फरक करणे कठीण झाले आहे. त्यामुळे सायबर चोरांचे फावले आहे आणि गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झालेली पहायला मिळते आहे.

अशी टाळता येईल फसवणूक

या प्रकारचा घोटाळा टाळण्यासाठी, सोशल मिडीयावर येणाऱ्या कुठल्याही मेसेजला प्रतिसाद देऊ नका. तसेच तुमची वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती देखील शेअर करू नका. कस्टमर केयर प्रतिनिधी कधीही तुमच्याकडून बँकेचे तपशील मागत नाहीत हे लक्षात असू द्या. तसेच ज्या सोशल मिडीया खात्यांशी तुम्ही संवाद साधत आहात हे खाते खरे आहे किंवा बनावट आहे याची आधी खात्री करून घ्या. यासाठी तुम्ही सदर खात्यांच्या प्रोफाईलवर जाऊन ते कधी सुरु केले गेले, त्याचे किती फॉलोअर्स आहेत, त्यांना कोण कोण फॉलो करत आहे याची माहिती घेऊन अंदाज लावू शकता.