Google Pixel 8 Launch: अॅपल कंपनीने नुकतेच आयफोन 15 सिरिज लाँच केली. अत्याधुनिक कॅमेरा, टायटॅनियम बॉडी, सुपरफास्ट प्रोसेसरसह इतर फिचर्सनी लोडेड असलेला हा फोन ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे. मात्र, आता अॅपलला टक्कर देण्यासाठी गुगलने पिक्सल 8 सिरिज लाँच केली आहे. हे फोन अॅपलचं मार्केट हिसकावून घेणार का? हे येत्या काळात कळेल.
गुगल कंपनीने काल (बुधवार) पिक्सल 8 आणि पिक्सल 8 pro हे दोन मॉडेल भारतात लाँच केले. हे दोन्ही मोबाइल 5G सपोर्टेड असून यात गुगलने तयार केलेला खास प्रोसेसर आहे. याचा परफॉरमन्स अॅपलच्या मोबाइलसारखाच तगडा असू शकतो. तसेच AI वर आधारित अडव्हान्स्ड कॅमेराही या फोनमध्ये आहे.
किंमत किती, प्री बुक कुठे करता येईल?
पिक्सल 8 ची भारतातील किंमत 75,999 पासून पुढे सुरू आहे. तर पिक्सल 8 Pro मोबाइलची किंमत 1,06,999 रुपये पासून पुढे आहे. हे दोन्ही मोबाइल फ्लिपकार्ट साइटवरून प्री ऑर्डर करता येतील. ICICI, कोटक, अॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे फोन खरेदी करताना 9 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटही मिळत आहे. ही प्री लाँच ऑफर असून काही दिवसांसाठीच असेल. त्यामुळे गुगल पिक्सल फोन स्वस्तात खरेदी करण्याची हीच योग्य संधी आहे.
पिक्सल 8 मधील फिचर्स काय आहेत?
पिक्सल 8 चा डिस्प्ले 6.2 इंच आहे. ज्यांना लहान साइजचा फोन आवडतो त्यांच्यासाठी हा मोबाइल योग्य ठरेल.
डिस्प्ले ब्राइटनेस 2000 निट्स पर्यंत आहे. अगदी कठीण अशी गोरिल्ला व्हिक्ट्स 2 ग्लास देण्यात आली आहे.
पिक्सल 8 मोबाइलला 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज दिला आहे. 256 GB स्टोरेज व्हेरियंटसुद्धा उपलब्ध आहेत. मात्र, त्याची किंमत 82,999 रुपये आहे.
तसेच गेमिंग आणि इतर कामांसाठी हाय परफॉर्मन्स मिळण्यासाठी Tensor G3 ही गुगलने तयार केलेली खास चिप सेट देण्यात आली आहे. तसेच अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टिम मिळेल.
पिक्सल 8 ला मागील बाजूस 50 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. याद्वारे 8x Super-Res digital zoom करता येईल. 12 मेगापिक्सल सेन्सर ऑटोफोकससह आहे. तर 10.5 मेगा पिक्सलचा सेल्फी कॅमेरा पुढील बाजून दिला आहे.
पिक्सल 8 Pro फिचर्स
पिक्सल 8 Pro मध्ये 6.7 इंचाचा QHD+ 120Hz LTPO OLED डिस्प्ले मिळतो.
ब्राइटनेस 2400 निट्स पर्यंत असून गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 सह हा फोन येतो.
सेल्फी कॅमेरा 10.5 मेगा पिक्सल आहे.
12 GB RAM आणि 128 जीबी स्टोरेज दिला असून या फोनची किंमत 1,06,999 रुपये आहे. इतर स्टोरेज व्हेरियंटमध्येही फोन उपलब्ध आहे. मात्र, स्टोरेजनुसार किंमत वाढते. तसेच तसेच अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टिम मिळेल.
मागील बाजूस 50 मेगापिक्सल IOS सह फेज डिटेक्ट ऑटोफोकस वाईड कॅमेरा देण्यात आला आहे. तर 48 मेगापिक्सल क्वाड PD अल्ट्रा वाइड सेन्सर आहे. सोबतच 48 मेगापिक्सल क्वाड-PD 5x झूम कॅमेरा आहे. या कॅमेराद्वारे 30 पट झूम करता येऊ शकते.
या मोबाइलला 5050 mAh ची बॅटरी असून 30W चा चार्जरद्वारे चार्जिंग करता येईल. 23W वायरलेस चार्जिंगचा सपोर्टही दिला आहे.
मोबाइल सोबत चार्जर कंपनीने दिला नाही. तुम्हाला बाजारातून वेगळा चार्जर विकत घ्यावा लागेल.
टेम्परेचर मॉनिटरिंग सेन्सर, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. या सोबतच दोन्हीही मोबाइलमध्ये इतर अनेक फिचर्स आहेत.