Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google मधील कर्मचाऱ्यांसोबत रोबोट्सचेही जॉब गेले; टेक जायंट गुगलमध्ये नक्की काय चाललंय?

Everyday Robots

Image Source : www.inventiva.co.in.com

गुगल कंपनीने Everyday Robots हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट बंद केला आहे. त्यामुळे 200 कर्मचारी आणि 100 रोबोटद्वारे जे काम केले जायचे ते बंद झाले आहे. ऑफिसमध्ये दरवाजे उघडण्यासाठी, कॅफेटेरियामध्ये टेबल साफ करण्यासाठी तसेच कचरा विलगीकरण करण्यासारख्या छोट्या मोठ्या कामांसाठी रोबोटचा वापर करण्यात येत होता.

Everyday Robots Project: जागतिक मंदीमुळे माहिती तंत्रज्ञानासह इतरही अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली. जानेवारी 2023 पासूनची आकडेवारी पाहता सुमारे दीड लाख कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी कामावरुन कमी केले. यामध्ये गुगलचाही समावेश आहे. 12 हजार कर्मचारी कपातीची घोषणा गुगलने केली होती. दरम्यान, कर्मचाऱ्यांसोबत गुगलमधील रोबोट्सचेही जॉब गेले आहेत. 100 पेक्षा जास्त रोबोट्सद्वारे जी सेवा देण्यात येत होती, ती सेवा बंद करण्यात आली आहे. 

लहानमोठी कामं करण्यासाठी रोबोटचा वापर बंद (Robots were used to do small work at google)

ऑफिसमध्ये दरवाजे उघडण्यासाठी, कॅफेटेरियामध्ये टेबल साफ करण्यासाठी तसेच कचरा विलगीकरण करण्यासारख्या छोट्या मोठ्या कामांसाठी रोबोटचा वापर करण्यात येत होता. माणसांची गरज पडणार नाही, अशी कामे रोबोटकडून करून घेण्यात येत होती. त्यासाठी 200 कर्मचाऱ्यांची टीम काम करत होती. या टीमने 100 रोबोट तयार केले होते. तसेच त्या रोबोटचे दैनंदिन काम या टीमकडून पाहण्यात येत होते. मात्र, खर्च कमी करण्यासाठी गुगलने हा प्रकल्प बंद करुन गुगलच्या रिसर्च लॅबमध्ये विलीन केला. गुगलची सहयोगी कंपनी अल्फाबेटद्वारे "एव्हरी डे रोबोट" हा प्रकल्प राबवण्यात येत होता. मात्र, आता कर्मचाऱ्यांबरोबरच रोबोटचेही काम गेले आहे. 

रोबोट प्रकल्प तोट्यात (Everyday robot project was in loss)

गुगलकडून सेल्फ ड्राइव्हिंग कार प्रकल्पावरही काम करण्यात येत आहे. मात्र, या प्रकल्पासोबत एव्हरी डे रोबोट हा प्रकल्प सुरू ठेवणे कंपनीला आर्थिकदृष्या परवडत नव्हते. एव्हरी डे रोबोट या प्रोजेक्टमध्ये 2022 वर्षात 1 बिलियन डॉलरचे नुकसान झाले, असे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे. वेळेच्या आधीचा हा प्रकल्प बंद केल्याची भावना काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. या टीममध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना दुसऱ्या प्रकल्पावर हलवण्यात आले तर काहींना कामावरुन काढून टाकण्यात आले. 

गुगलकडून 12 हजार कर्मचारी कपातीची घोषणा (Google layoff 12 thousand employee)

रोबोट चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य कामे करू शकतो. (Everyday Robots project) प्रकल्पावर नीट लक्ष देऊन काम केले असते तर पुढील पाच वर्षात बाजारात एक नवीन प्रॉडक्ट लाँच करता आले असते, असे गुगलच्या एका माजी कर्मचाऱ्याने मत व्यक्त केले. गुगलने यावर्षी जानेवारी महिन्यात कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार गुगलच्या विविध सहयोगी कंपन्यांतील 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं.

माहिती तंत्रज्ञानासह इतरही अनेक क्षेत्रातील कंपन्यांचा विकास खुंटला असून अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले जात आहे. जागतिक स्तरावर मंदीची शक्यता निर्माण झाली असून अस्थिर परिस्थितीत खर्च कमी करण्याकडे कंपन्यांचा ओढा आहे. गुगल, फेसबुक, अॅमेझॉन, मेटा सह इतरही अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. नुकतेच एरिक्सन या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीने 8500 कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला. कंपन्यांनी तोट्यातील तसेच भविष्यात सुरू होणाऱ्या प्रकल्पांवर तात्पुरती स्थगिती आणली आहे.