Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Chrome Passkey : पासवर्ड लक्षात ठेवायची डोकेदुखी विसरा, वेबसाइटवर लॉगइन करा विनापासवर्ड

Google Chrome passkey

क्रोम बाऊजरद्वारे तुम्ही विविध वेबसाइट आणि पोर्टलवर लॉग इन होत असता. त्यासाठी तुम्हाला युझर आयडी आणि पासवर्ड लागतो. मात्र, आता गुगल क्रोमने पास की (Google Passkey feature) हे फिचर सुरू केले आहे. हे पासवर्डपेक्षा जास्त सुरक्षित आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये विना पासवर्ड आणि युजरनेमशिवाय लॉगइन करू शकता.

आठवा बरं! पासवर्ड विसरल्यामुळे तुम्हाला कधी अडचणीचा सामना करावा लागला आहे का? पासवर्ड विसरल्यामुळे लॉगइन करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्नही केले असतील. असा एकही युजर नसेल जो इंटरनेटवर असलेल्या विविध प्रकारच्या अकाऊंटचा पासवर्ड विसरला नसेल. ही पासवर्डची डोकेदुखी दूर करण्यासाठी गुगलने एक हायटेक फिचर आणलेय. या फिचर्सद्वारे तुम्ही कोणत्याही वेबसाइटच्या खात्यावर विनापासवर्ड फक्त एका पासकीने (Google passkey) लॉगइन करू शकता, तेही एकदम सुरक्षितपणे. तर पाहूया हे फिचर नक्की काय आहे?

कोणत्याही वेबसाइटवर लॉनइन करा पास की द्वारे (log in through google passkey)


क्रोम बाऊजरद्वारे तुम्ही विविध वेबसाइट आणि पोर्टलवर लॉग इन होत असता. त्यासाठी तुम्हाला युझर आयडी आणि पासवर्ड लागतो. मात्र, आता गुगल क्रोमने पास की (Google Passkey feature) हे फिचर सुरू केले आहे. हे पासवर्डपेक्षा जास्त सुरक्षित आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये विना पासवर्ड आणि युजरनेमशिवाय लॉगइन करू शकता. त्यासाठी तुम्हाला लागेल फक्त पासकी जी तुमच्या मोबाईलवरही मिळू शकते. जसे तुम्ही पिन टाकून किंवा फिंगर प्रिंटने मोबाईलला लॉन इन करता अगदी तसेच तुम्ही कोणत्याही वेबसाइटवर लॉग इन करू शकता. 

पास की कसे काम करते? (How passkey works)

एखाद्या व्यक्तीचे विविध वेबसाइट, पोर्टल, अॅप्सवर खाते असते. जसे की, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, जॉब पोर्टल, शैक्षणिक संकेतस्थळे, खासगी कामाच्या वेबसाइट्स. इंटरनेटवरील ज्या वेबसाइट्स गुगल एपीआयशी जोडल्या गेलेल्या असतील त्या वेबसाइटवर लॉग इन करायचे असेल तर तुम्हाला एक पास की मिळेल. ती पास की कशी मिळवायची यासाठी तुम्ही पर्याय निवडू शकता. ती लॉग इन करता मोबाइलवरही मिळू शकते. ही पास की अॅक्सेप्ट केली की तुम्हाला तुमच्या खात्यात प्रवेश मिळेल. एका वेळी वापरण्यात आलेली पासकी तुम्ही दुसऱ्या वेळी वापरू शकत नाही. दुसऱ्या वेळी लॉन इन करता पुन्हा नवीन पासकी तुम्हाला मिळेल. लॉग इन करण्यासाठी युजर नेम आणि दहा बारा अंकी पासवर्डची गरज पडणार नाही. तुमची जी वैयक्तिक माहिती गुगलकडे सेव आहे त्यावरुन तुमची ओळख पटवली जाईल.  

API म्हणजे काय? (What is API)

अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस हा दोन किंवा अधिक संगणक प्रणालींना एकमेकांशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे. जसे की इंटरनेटवरील एखादी वेबसाइट आणि गुगल या दोघांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी API गरज पडते. या API द्वारे माहितीची देवाणघेवाण होते. त्यानंतरच पुढील प्रक्रिया करण्यास परवानगी मिळते.

हे फिचर आणण्याची गरज काय?

वापरकर्त्यांकडून अनेक वेळा खूप सोपे पासवर्ड सेट केले जातात. त्यामुळे तुमचे खाते हॅकही केले जाऊ शकते. तसेच इतर खातेधारकांची सुरक्षितताही धोक्यात येते. अनेकजण एकसारखेच पासवर्ड ठेवतात. त्यामुळे हॅकर्ससाठी सुरक्षा जाळे तोडून वेबसाइटमध्ये प्रवेश करणे अत्यंत सोपे होते. अनेक वेळा आपण पासवर्ड विसरतो आणि ऐनवेळी पंचायत होते. अनेक प्रयत्न करुनही लॉग इन करता येत नाही. कारण बरेचजण मोबाईल नंबर आणि जी मेल खाते बदलत असतात. त्यामुळे आता पासवर्ड वेबसाइटवर लॉग इन करणं अत्यंत सोपे होणार आहे. गुगलने हे फिचर अँड्रॉइड, विंडोज ११, मॅक ऑपरेटिंग सिस्टिमसाठी सुरू केले आहे. गुगल पासवर्ड मॅनेजरद्वारे सुरक्षितपणे हे फिचर काम करेल.