शेअर मार्केटमध्ये घसरण झाली असली तरी कमॉडिटी बाजारात तेजीत आहे. आज शुक्रवारी 7 जुलै 2023 रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोन्याचा भाव 437 रुपयांनी वाढला. चांदी 861 रुपयांनी महागली.
एमसीएक्सवर संध्याकाळी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58838 रुपये इतका वाढला. त्यात 437 रुपयांची वाढ झाली. आज इंट्राडेमध्ये सोन्याचा भाव 58949 रुपयांच्या पातळीवर गेला होता.
कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याप्रमाणेच चांदीदेखील गुंतवणूकदारांनी चांगली खरेदी केली. एक किलो चांदीचा भाव 71185 रुपये इतका वाढला. एक किलो चांदीमध्ये आजच्या सत्रात 861 रुपयांची वाढ झाली.
सोन्याचा 20 दिवसांचा मूव्हींग एव्हरेज हा 58800 रुपयांच्या आसपास आहे. तेजीचा विचार केला तर सोने नजीकच्या काळात याच पातळीवर ट्रेड करेल, असे मत कमॉडिटी विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. अमेरिकेत रोजगार संधी वाढल्या आहेत. ज्यामुळे फेडरल रिझर्व्हच्या जुलैमधील बैठकीत दरवाढीला विराम दिला जाईल,अशी शक्यता वर्तवली जाते.
सेवा क्षेत्राने जून महिन्यात चांगली कामगिरी केली. सलग सहाव्या क्षेत्रात सेवा क्षेत्र विस्तारले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था वाढत असल्याचे दिसून आले आहे. याचे पडसाद नजिकच्या काळात कमॉडिटी मार्केटवर उमटण्याची शक्यता आहे. जागतिक कमॉडिटी मार्केटमध्ये सोन्याचा भाव 1900 डॉलर प्रती औंस इतका आहे. यापूर्वी तो 1927 डॉलर इतका गेला होता.
Goodreturns.in या वेबसाईटनुसार आज मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 54250 रुपये इतका आहे. त्यात 100 रुपयांची घसरण झाली. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 59160 रुपये इतका आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 54400 रुपये असून चांदीचा भाव 59220 रुपये इतका आहे.