जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा हे सध्या भारतभेटीवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या, धोरण ठरविणाऱ्या व्यक्तींची, अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. या दरम्यान त्यांनी आपले निरीक्षण नोंदवताना म्हटले आहे की, कोरोना काळातील आव्हानांमधून बाहेर पडत भारत आता आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या मंदीच्या काळात भारत अशी अनेक पावले उचलत आहेत, ज्यामुळे त्यांना पुढे ठेवण्यास मदत होत आहे.
देशांतर्गत मागणीवर ठेवावे लागेल लक्ष
जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचे सावट असताना, मोठमोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावर काढूल टाकत असताना भारतात मात्र चित्र आशादायी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे देशांतर्गत असलेली मागणी आणि त्यासाठी आवश्यक असलेला पुरवठा. भारताने येत्या काळात देशांतर्गत मागणीला अधिक महत्व द्यायला हवे, असे अजय बंगा यांनी म्हटले आहे. देशांतर्गत मागणीचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) महत्वाचा वाटा असतो, त्यामुळे सामान्य नागरिकांची उत्पादक क्षमता आणि खरेदी क्षमता वाढवणे यावर भारताने जोर द्यायला हवा असेही ते म्हणाले.
India has opportunity to create jobs in manufacturing sector by tapping into ‘China plus one’ opportunity, says World Bank President Ajay Bangahttps://t.co/Ng38Zno5q2
— All India Radio News (@airnewsalerts) July 20, 2023
भारत सरकार सध्या यावर काम करत असल्यामुळे जागतिक पातळीवर मंदी असतानाही देशांतर्गत उत्पादन आणि पुरवठ्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुरक्षित आहे, असे निरीक्षण बंगा यांनी नोंदवले आहे.
बेरोजगारीचा प्रश्न!
जागतिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर सध्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या ज्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे ते क्षेत्र आहे तंत्रज्ञान. या क्षेत्रात कुशल कर्मचारीचा आवश्यक आहेत. ज्यांच्याकडे स्किल्स नाहीत असे कर्मचारी काम करू शकत नाही. एकीकडे तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कमर्चारी नाहीत म्हणून प्रश्न मांडतात तर दुसरीकडे बेरोजगार तरुण रोजगार नाहीत म्हणून हैराण आहेत. या दोन्ही गोष्टींचा विचार केल्यास येणाऱ्या कालाय तंत्रज्ञान आणि उत्पादन या दोन्ही क्षेत्रातील नोकऱ्या वाढणार आहेत असे ते म्हणाले.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला जागतिक जीडीपीमध्ये मंदीचा धोका अधिक असणार आहे. तरीही, सर्व आव्हाने असूनही, जागतिक अर्थव्यवस्थेने आपल्या क्षमतेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे असे अजय बंगा यांनी म्हटले आहे.