सध्या बाजारपेठेत वेगवेगळे फीचर्स असणारे स्मार्टवॉच पाहायला मिळत आहेत. वाढती बाजारपेठेतील स्पर्धा लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी आता स्मार्टवॉचच्या किंमती कमी केल्या आहेत. नुकतेच Gizmore कंपनीने त्यांचे नवीन स्मार्टवॉच भारतात लॉन्च केले आहे. Gizmore कंपनीने असा दावा केला आहे की, इतर स्मार्टवॉचच्या किंमतीच्या तुलनेने Gizmore कंपनीचे स्मार्टवॉच सगळ्यात बेस्ट आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या वेबसाईटवर आणि ऑनलाईन रिटेल वेबसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart) या वॉचच्या खरेदीवर बक्कळ डिस्काउंट देण्यात येत आहे. या निमित्ताने Gizmore च्या स्मार्टवॉचची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.
‘Gizmore Curve’ वॉचचे फीचर्स जाणून घ्या
Gizmore कंपनीच्या या नवीन स्मार्टवॉचचे नाव 'Gizmore Curve Ultra HD' असे आहे. या वॉचचा डिस्प्ले कर्व्ह असून Ultra HD फीचर्स आणि 1.39 इंचाची डिस्प्ले साईज देण्यात आली आहे. तसेच यात 360 पिक्सल रिजोल्यूशन दिले आहे. याची कर्व्ह डिझाईन ही स्लिम मेटल बॉडीपासून बनवण्यात आल्यामुळे अधिक आकर्षक दिसते.
यामध्ये 500 निट्सचा ब्राईटनेस देण्यात आला आहे, ज्यामुळे तीव्र उन्हात देखील वापरकर्त्याला स्क्रीन सहज पाहता येईल.
Gizmore च्या या वॉचमध्ये क्लाउड बेस्ड वॉच फेस दिला आहे. या वॉचला चार्ज केल्यानंतर 10 दिवस बॅटरी पूर्ण क्षमतेने काम करते.
या वॉचमध्ये अनेक नवनवीन फीचर्स जसे की, हेल्थ आणि फिटनेस मोड दिला आहे. याशिवाय 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड दिले आहेत. SP02 मॉनिटर, 24/7 हार्ट रेट्स मॉनिटर,कॅलरी काऊंटर, बॉडी हायड्रेशन काउंटर, मासिक पाळी संदर्भातील ट्रॅकर, स्लिप मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर आणि ब्रिदिंग मॉनिटर देण्यात आला आहे.
या वॉचला IP67 रेटिंग देण्यात आले असून हे वॉच उन्हात किंवा पाण्यात पटकन खराब होत नाही. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग, AI व्हॉइस असिस्टंट आणि calculator सारखे ऍडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत.
Gizmore कंपनीच्या या नवीन स्मार्टवॉचला 1 वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.
किंमत जाणून घ्या.
Gizmore वॉचची किंमत 5499 रुपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र ग्राहकांना हे वॉच केवळ 1499 रुपयांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वरून खरेदी करता येणार आहे. तसेच ऑनलाईन रिटेल वेबसाईट फ्लिपकार्टवर ग्राहकांना या वॉचच्या खरेदीवर 76% डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट पकडून या वॉचची किंमत 1299 रुपये होत आहे.
Source: navbharattimes.indiatimes.com