आपल्या संस्कृतीमध्ये महिलांना विशेष आदराचे स्थान दिले जाते. आपल्या धार्मिक कार्यामध्येही विविध वेदांमधून, धार्मिक विधींच्या माध्यमातून देवतांना दिलेले प्रथम स्थान दिसून येते. प्रत्येकांना या स्त्री शक्तीची जाणिव व्हावी यासाठी विशेष विधी ही साजरे केले जातात. असाच एक विधी म्हणजे कन्यापूजन. दुर्गा मातेच्या उपासनेसाठी साजरा करीत असलेल्या Navratri या उत्सवामध्ये शेवटच्या दोन दिवसात म्हणजेच अष्टमी व नवमीच्या दिवशी कुमारिकांचे आदरातिथ्य करून त्यांचे विधीवत पूजन केले जाते. या विधीनंतर त्या कुमारिकांना गोडधोड जेवण आणि काही भेटवस्तूही दिल्या जातात. पण दरवर्षी पेच पडतो तो म्हणजे दरवर्षी नक्की काय Gift द्यायचं. तर आज आपण पाहूया आपल्या खिशाला परवडतील अशा या Gifts साठी काय काय Trending पर्याय आहेत…
Table of contents [Show]
केसरचनेसाठी उपयुक्त गोष्टी (Hair Accessories)
आरशा समोर उभं राहून स्वत:ला सजवणे हा बहुतांशी मुलींचा आवडता छंद आहे. वेगवेगळ्या पद्धतीने केस बांधण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू (accessories) बाजारात ठिकठिकाणी दिसून येतात. त्यापैकीच फ्लॉवर प्रिंटेड वा रंगबेरंगी रबरबँन्ड, प्रिंटेड कार्टूनिस्ट हेअरबँन्ड, क्लिप्स, टिक-टॉक क्लिप्स असा विविध केसरचना वस्तूंचा सेट भेटवस्तू म्हणून देता येईल. बाजारात यासाठी खूप पर्याय उपलब्ध असल्या तरी लोकल ट्रेनमध्ये, डिमार्टमध्ये खूपच किरकोळ किंमतीमध्ये या वस्तू तुम्हाला मिळू शकतात.
क्रिएटिव्ह गेम्स (Creative or Fun Games)
मुलांच्या बौद्धीक वाढीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि व्यायामाची सवय लागावी यासाठी बाजारात आता अनेक प्रकारचे खेळ (Games) उपलब्ध आहेत. मुलांच्या बुध्दीला चालना देण्यासह त्यांचे स्क्रिनिंग टाइम म्हणजे मोबाईल टिव्हीपासून मुलांना दुर ठेवावे, असा दुहेरी उद्देश ही साध्य करता येतो. यासाठी क्रॉसवर्ड, पझल्स, दोरीउड्या, स्क्राबल वर्ल्डस् अशा भेटवस्तूंचा विचार करता येऊ शकतो.
सृजनशील स्टेशनरी वस्तू (Creative Stationary Items)
हा पर्याय आपल्याला सुरुवातील पारंपारिक पद्धतीचा वाटेल मात्र जर का तुम्ही बाजारात नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये कित्येक वस्तू सृजनशील (Creative) स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये पर्यावरणाला पूरक असलेल्या किंवा टाकाऊ पासून बनवण्यात आलेल्या वस्तू आपण मुलींना देऊ शकतो. यासोबतच पर्यावरणाची निगा राखणे, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करण्यासाठी व वापरण्यासाठी ही प्रोत्साहित करु शकतो.
पुस्तके (Books)
मुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना प्रेरणादायी पुस्तकांची भेट देणे कदापी स्वागर्ताह आहे. प्रेरणादायी महिलांच्या कथा सांगणारे, चांगल्या बोधपर,धार्मिक, देशभक्तीपर वा माहितीपर पुस्तकांची भेट आपण देऊ शकतो. यामध्ये सुधा मुर्ती यांचे ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरिज, रस्किन बॉँन्ड यांचे ग्रेट स्टोरिज फॉर चिल्ड्रेन, शिवांशू गुप्ता यांचे 13 लाईफ लेसन्स बाय अ 13 इयर ओल्ड असे खूप चांगले चांगेल पुस्तक आपण या कन्यारत्नाना भेट देऊ शक
स्नॅक्स (Snacks)
कन्यापूजनाच्या धार्मिक विधीमध्ये या कुमारिकांना हळवा-पूरी असे गोड पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो. पण यंदा मात्र, तुम्ही या प्रसादा सोबत कुमारिकांना ताज्या फळांचा रस, घरी बनवलेले चॉकलेट्स, बिस्कीट्स ही देऊ शकतो जे की मुलींनाही खायला खूप आवडतील.
Gift these items to little avatars of Maa Durga on Kanya Pujan
— ANI Digital (@ani_digital) March 27, 2023
Read @ANI Story | https://t.co/5ixb79exnM#navratri2023 #KanyaPujan #KanyaPujanGifts pic.twitter.com/mh9sNZZlnI
फोटो फ्रेम (Photo Frame)
फोटो काढणे हा अलीकडे सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय बनत आहे. तेव्हा आपल्या घरी येणाऱ्या कुमारिकांना त्यांचा आवडता फोटो हा खूप ट्रेडिंग डिझाईन फ्रेम मध्ये तयार करून दिल्यास ही भेटवस्तू कुमारिकांच्याही कायमस्वरूपी लक्षात राहण्याजोगे ठरेल.
तर मग यंदाच्या कन्यापूजनासाठी तुम्ही आतापासूनच तयारी सुरू करा. आपल्या खिशांना परवडतील अशा आम्ही सुचवलेल्या पर्यांयाचा नक्की विचार करा. आणि तुम्हालासुद्धा याहून काही हटके पर्याय सुचन असतील तर महामनीला जरूर कळवा.
Source - https://bit.ly/3JQp74c