Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

International Day of Sign Languages : कॉक्लियर इम्प्लांट सर्जरीसाठी मिळवा 6 लाखांपर्यंत अर्थसहाय्य

International Day of Sign Languages

ज्यांना बोलता येत नाही आणि ऐकता येत नाही असे लोक संवादासाठी सांकेतिक भाषेचा वापर करतात. भारतात भारतीय सांकेतिक भाषा (Indian Sign Language) वापरली जाते. भारतीय कर्णबधीर नागरिक दोन्ही हातांचा वापर करून सांकेतिक भाषेतून एकमेकांशी संवाद साधतात. संवादाचे माध्यम म्हणून ISL आता चांगलीच प्रचलित झाली आहे

आपल्या समाजात असे काही नागरिक आहेत ज्यांना ऐकू येत नाही. अशांना कर्णबधीर देखील म्हणतात. ऐकू येत नसल्यामुळे त्यांना भाषा ज्ञान नसते आणि भाषेशी ओळख नसल्यामुळे ते बोलू शकत नाही. राष्टीय आरोग्य मिशनच्या माहितीनुसार देशात जवळपास 63 दशलक्ष नागरिक हे कर्णबधीर आहेत.

आता ज्यांना बोलता येत नाही आणि ऐकता येत नाही असे लोक संवादासाठी सांकेतिक भाषेचा वापर करतात. भारतात भारतीय सांकेतिक भाषा (Indian Sign Language) वापरली जाते. भारतीय कर्णबधीर नागरिक दोन्ही हातांचा वापर करून सांकेतिक भाषेतून एकमेकांशी संवाद साधतात. संवादाचे माध्यम म्हणून ISL आता चांगलीच प्रचलित झाली आहे. मुंबईतील बांद्रा स्थित अली यावर जंग राष्ट्रीय दिव्यांग संस्थान (Ali Yavar Jung National Institute for Hearing and Speech Disability) कर्णबधीर नागरिकांना ही भाषा शिकवण्यासाठी अभ्यासक्रम देखील चालवते. याशिवाय सामान्य नागरिक देखील या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.

मोफत उपचार 

ज्या कर्णबधीर नागरिकांना थोडेसे का होईना ऐकू येते अशांना कानाचे मशीन बसवून दिले जाते. अली यावर जंग राष्ट्रीय दिव्यांग संस्थानमध्ये अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना मोफत आणि इतरांना अल्प दरात कानाचे मशीन बसवून दिले जाते. याशिवाय कान, नाक, घसा तज्ञांकडून मोफत मार्गदर्शन देखील मिळते. कर्णबधीर नागरिकाची स्पीच टेस्ट (Speech Test), अभ्यास गुणवत्ता टेस्ट आणि मार्गदर्शन (Educational Evaluation and Guidance) मोफत केले जाते.

मोफत दिव्यांग प्रमाणपत्र 

सदर संस्थान हे भारत सरकारच्या सामाजिक कल्याण मंत्रालयातर्फे चालवण्यात येते. इथे कर्णबधीर नागरिकांना मोफत ‘दिव्यांग प्रमाणपत्र’ (Disability Certificate) दिले जाते. यासाठी नागरिकांना कुठलेही शुल्क देण्याची गरज नाहीये. पा प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांग व्यक्ती सरकारी योजनांचा लाभ घेण्यास पात्र ठरतात.

कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी (Cochlear Implant Surgery)

सांकेतिक भाषेचा वापर करून संवाद साधने ही एक निकड बनली आहे. मात्र मानवाच्या कर्णयंत्रात असलेला बिघाड दुरुस्त करणे हा एक नवा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. लहान वयातच जर यावर उपचार झाले तर कर्णबधीर होण्यापासून आपण मुलांना वाचवू शकतो. यासाठी कर्णयंत्रात एक मशीन बसवले जाते आणि त्याद्वारे मुलांना ऐकायला येऊ शकते.

ही सर्जरी सरकारी अनुदानातून करता येते. यासाठी दरवर्षी 500 मुलांसाठी प्रत्येकी 6 लाख रुपयांची तजवीज सरकारमार्फत केली जाते. ही सर्जरी वय वर्षे 0 ते 5 वयोगटातील बालकांचीच केली जाते. केंद्र सरकारची ही योजना राबवण्यासाठी प्रत्येक राज्यात केंद्र सरकारने यासाठी काही रुग्णालये नामनिर्देशित केली आहेत. या रुग्णालयांची लिस्ट तुम्ही बघू शकता.

तेव्हा या आंतराष्ट्रीय सांकेतिक दिनानिमित्त ही माहिती कर्णबधीर नागरिकांना आणी त्यांच्या कुटुंबियांना जरूर पाठवा. त्यांच्यासाठी असलेल्या खास सरकारी योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा.