Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming IPO: गुंतवणुकीसाठी राहा तयार! लवकरच येतोय 'या' हॉस्पिटलचा आयपीओ,जाणून घ्या सविस्तर माहिती

Upcoming IPO

Upcoming IPO: तुम्हालाही आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पुढील आठवड्यात 'यथार्थ हॉस्पिटल इंडिया'चा आयपीओ ओपन होणार आहे. या आयपीओत गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकतात. या आयपीओ बाबतची माहिती जाणून घेऊयात.

आयपीओ (IPO) गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधत असाल, तर पुढील आठवड्यात 'यथार्थ हॉस्पिटल इंडिया'चा आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहे. यथार्थ हॉस्पिटल आणि ट्रॉमा केअर सर्विसेस (Yatharth Hospital and Trauma Care Services) हे एक मल्टीकेअर हॉस्पिटल आहे. दिल्ली एनसीआरमधील टॉप 10 हॉस्पिटलमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. 450 बेड्सचे प्रशस्त असणारे हे हॉस्पिटल दिल्ली एनसीआरमधील नोएडा, ग्रेटर नोएडा आणि नोएडा एक्सटेंशनमध्ये उभारण्यात आले आहे.

याशिवाय यथार्थ हॉस्पिटल इंडियाने मध्यप्रदेशातील ओरछा येथे 350 बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खरेदी केले आहे. यथार्थ हॉस्पिटल इंडिया आपला कारभार विस्तारण्याच्या दृष्टिकोनातून बाजारात आपला आयपीओ घेऊन येत आहे. जर तुम्हालाही या हॉस्पिटलचा आयपीओ खरेदी करायचा असेल, तर आयपीओ बाबतची माहिती जाणून घेऊयात.

यथार्थ हॉस्पिटल इंडियाच्या आयपीओ बाबत जाणून घ्या

यथार्थ हॉस्पिटल इंडियाचा आयपीओ पुढील आठवड्यात म्हणजेच 26 जुलै रोजी ओपन होणार आहे. तर गुंतवणूकदारांना 28 जुलैपर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओचा प्राईस बँड 10 रुपये फेस व्हॅल्यूसह निश्चित करण्यात आला आहे.

कंपनीच्या शेअर्सचे अलॉटमेंट 2 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात येईल. तर 7 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक बीएसई (BSE) आणि एनएससीवर (NSE) सूचीबद्ध करण्यात येईल. लहान आणि मध्यम रिटेल गुंतवणूकदारांसाठी या आयपीओमध्ये 35 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे.

आयपीओतील पैशांचा वापर कुठे केला जाईल?

सध्या यथार्थ हॉस्पिटल इंडियामध्ये जवळपास 370 डॉक्टरांची मोठी टीम कार्यरत आहे. आयपीओमधून उभारण्यात आलेल्या पैशाचा वापर यथार्थ हॉस्पिटलच्या आरोग्य सेवांसाठी वापरण्यात येईल. सर्व प्रकारच्या विशेष आणि सुपर स्पेशालिटी सेवा देण्यासाठी ही रक्कम खर्च करण्यात येईल. तसेच उर्वरित रक्कम कर्ज परतफेडीसाठी आणि इतर कॉर्पोरेट कामांसाठी वापरली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

Source: zeebiz.com