Jio Special Offer: रिलायन्स जिओ आपल्या मोबाईल ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरचा लाभ 30 सप्टेंबरपर्यंतच घेता येणार आहे. जिओने आपल्या 7व्या वर्धापन दिनानिमित्ताने ग्राहकांना 21GB अतिरिक्त डेटा फ्रीमध्ये देत आहे. त्याचबरोबर कंपनी 5G आणि व्हॉईस कॉलचाही बेनिफिट देत आहे.
या प्लॅनवर मिळत आहे 21GB अतिरिक्त डेटा
रिलायन्स जिओने ऑफर जाहीर केलेल्या प्लॅनमध्ये 299 रुपये, 749 रुपये आणि 2,999 रुपये या प्लॅनचा समावेश आहे. त्यापैकी 2,999 रुपयांच्या प्लॅनवर 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.तसेच या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा वापरण्यासाठी मिळतो. म्हणजे ग्राहकांना या प्लॅनमधून वर्षाला 912.5GB डेटा मिळतो. त्यात आता स्पेशल ऑफरमधून या प्लॅनमध्ये ग्राहकांना 21GB डेटा अतिरिक्त दिला जात आहे. ग्राहकांना 2,999 रुपयांच्या प्लॅनमधून वर्षाला 933GB डेटा मिळत आहे.
749 रुपयांच्या प्लॅनमधून ग्राहकांना काय मिळतंय
जिओच्या 749 रुपयांच्या प्लॅनमधून ग्राहकांना 90 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे. तसेच प्रत्येक दिवसासाठी 2GB डेटा असून 90 दिवसांसाठी 180GB डेटा दिला जात आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि 100 SMS फ्रीमध्ये दिले जात आहे. त्यासोबत Jio TV, Jio Cinema, Jio Security, Jio Cloud या अॅपचे फ्री सब्स्क्रिप्शन मिळत आहे आणि स्पेशल ऑफर अंतर्गत या प्लॅनवर ग्राहकांना 14GB डेटा जास्त मिळत आहे.
जिओ 299 रुपयांचा प्लॅन
299 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना दररोज 2GB डेटा वापरण्यासाठी मिळतो. म्हणजेच 28 दिवसांत युझर 56GB डेटा वापरतो. जिओच्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीने आणलेल्या ऑफरमधून ग्राहकांना या प्लॅनवर 7GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. त्याचबरोबर व्हॉईस कॉल आणि 100 SMS फ्री आहेत आणि Jio Cinema, Jio TV च्या अॅपचे फ्री सब्स्क्रिप्शन मिळत आहे.