भारत हा शेतीप्रधान देश आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. आपली अर्थव्यवस्था ही हेतीवर आधारित आहे हे देखील आपल्याला माहित आहे. एका दाण्यातून हजारो दाणे निर्माण करण्याची उत्पादकता शेतीत आहे. आजवर आपल्या देशात शेतीवर अनेक प्रयोग झाले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका प्रयोगाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यातून तुम्हांला लाखो रुपये उत्पादन मिळू शकेल. बांबू शेतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बांबूची शेती कशी करतात, त्यातून उत्पन्न कसं मिळवायचं आणि त्यासाठी सरकार अनुदान देते का, हे आपण जाणून घेणार आहोत. बांबू हे एक असे शेती उत्पादन आहे, ज्याची संपूर्ण वाढ झाल्यानंतर प्रत्येक झाडामागे तुम्हाला 300-400 रुपयांपेक्षा जास्त किंमत मिळतात. कदाचित ही रक्कम तुम्हांला कमी वाटू शकते. परंतु कमी जागेत खूप सारे बांबू उगवतात, त्यामुळे उत्पन्न देखील वाढते हे लक्षात असू द्या. जर तुमच्याकडे 1 हेक्टर जमीन असेल तर तुम्ही दरवर्षी 7-8 लाख रुपये सहज कमवू शकता.
सरकारी मदत कशी मिळवाल?
बांबू शेतीला सरकारी अनुदान देखील मिळते. बांबू शेती विकसित करून तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रोत्साहनप्र अनुदान देखील दिले जाते. भारत सरकारतर्फे National Bamboo Mission 2018 सालापासून राबवले जाते.सरकारच्या या नॅशनल बांबू मिशनअंतर्गत सुमारे 50% आर्थिक अनुदान बांबू शेतीसाठी दिले जाते. बजारात बांबूच्या एका रोपाची किंमत सुमारे 250 रुपये इतकी आहे. सरकारी अनुदानास जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हांला अर्ध्या किमतीत हे रोप मिळेल. बांबू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते एका हेक्टरमध्ये 1500 बांबू रोपे लावले जाऊ शकतात. त्यासाठी एकूण खर्च 3 लाख 60 हजार रुपयांच्या जवळपास येईल. यातील जवळपास निम्मी रक्कम तुम्हाला सबसिडी म्हणून मिळेल.
जर तुम्ही 1500 बांबूच्या झाडांची लागवड केली तर तुम्हाला 500 रुपये प्रति बांबू या दराने 7.50 लाख रुपये मिळू शकतात. बांबूची आणखी चढ्या दराने विक्री झाल्यास हे उत्पन्न आणखी वाढू शकते.
The #NationalBambooMission's initiatives help farmers tap into the lucrative market for bamboo products. pic.twitter.com/9T22Zx63Y8
— Shobha Karandlaje (@ShobhaBJP) March 13, 2023
बांबूच्या शेतीचे फायदे
बांबूची शेती भारतात लोकप्रिय होत आहे कारण ही शेती पर्यावरणीयदृष्ट्या अधिक शाश्वत मानली जाते. तसेच यातून चांगले उत्पादन देखील मिळते. भारताचा विचार केला तर भारतात बांबूच्या विविध प्रजाती आढळतात.
भारतातील बांबूची शेती प्रामुख्याने आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोराम या ईशान्य भारतातील राज्यांमध्ये केली जाते. परंतु, अलिकडच्या काही काळात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र यासारख्या इतर राज्यांनीही बांबूची लागवड सुरू केली आहे.
भारतात बांबूची शेती हस्तकला, फर्निचर आणि कागद उद्योगासाठी कच्चा माल उत्पादित करण्यासाठी मुख्यत्वे केली जाते. बांबूला मोठ्या प्रमाणात औद्योगिक मागणी असल्यामुळे अनके शेतकरी बांबू शेतीकडे वळताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे बांबूचे झाड माती संवर्धन, धूप नियंत्रण करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. नॅशनल बांबू मिशन (NBM) शेतकऱ्यांना बांबू लागवड, काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि त्याचे मार्केटिंग करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवते.
बांबू लागवड
बांबू शेतीसाठी विशेष मेहनत लागत नाही. असे असले तरी झाडांची संपूर्ण लागवड होईपर्यंत रोपाची निगा राखणे गरजेचे आहे. बांबू 4 वर्षात विक्रीयोग्य बनतात, म्हणजेच लागवडीपासून 4 वर्षे बांबू शेतीकडे लक्ष द्यावे लागते. अळीचा प्रादुर्भाव, कीड, वाळवी लागू नये यासाठी पेस्ट कंट्रोल, खतांचा वापर करावा लागतो. एकदा की रोपांची वाढ पूर्ण झाली की, बांबूचे रोप पुढची 40 वर्षे वाढतच राहतात. परंतु वेळोवेळी केमिकल फवारणी, खत आणि आवश्यक पाण्याचा पुरवठा पिकाला करावाच लागतो.भारतात बांबूचे एकूण 136 प्रकार उपलब्ध आहेत.तुमच्या शेतीचा पोत, हवामान, लागवडयोग्य जागा लक्षात घेऊन शेती संबंधी मार्गदर्शन देखील नॅशनल बांबू मिशनद्वारे दिले जाते.