वीज क्षेत्रातल्या कंपनीचा शेअर जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडनं (Genus Power Infrastructures Ltd) आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर (Multibagger) असा बंपर परतावा दिला आहे. 6 महिन्यांचा परतावा पाहिल्यास तो दुप्पट असल्याचं दिसून आलं आहे. तर 3 वर्षातल्या परताव्याचा (Return) आढावा घेतल्यास तब्बल 690% इतका बंपर परतावा दिला आहे. आकडेवारीत पाहिल्यास साधारणपणे 3 वर्षांपूर्वी एखाद्यानं यात गुंतवणूक केली असेल तर आज त्याचं मूल्य 7.90 लाख रुपये झालं असतं.
महिनाभरात 57 टक्क्यांनी उसळी
शेअर बाजारात हा स्टॉक सध्या चांगलाच वधारला आहे. महिन्याभराच्या कालावधीत स्टॉकनं 57 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. मागच्या महिन्यात या स्टॉकनं 111 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. वर्षभराचा विचार केला तर 114.12 टक्के इतकी उसळी घेतल्याचं दिसून आलं. याच वर्षभराच्या कालावधीत 132.82 टक्के परतावा दिला आहे.
तीन वर्षात बंपर परतावा
मागच्या 3 वर्षांपासून गुंतवणूक करणाऱ्यांना तर बंपर परतावा मिळत आहेच. मात्र एका वर्षाआधी 1 लाख रुपये गुंतवणाऱ्यांच्या पैशांचं मूल्य या घडीला 1.57 लाख रुपये झालं आहे. 6 महिन्यात 1 लाख लावणाऱ्यांचं मूल्य 2.11 लाख रुपये झालं आहे. म्हणजेच गुंतवणूक करणाऱ्यांच्या पैशांमध्ये दुप्पट प्रमाणात वाढ दिसून येत आहे.
शेअर वधारण्याचं कारण
जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड या कंपनीच्या शेअर आणि त्याचा कालावधीनुसार परतावा आपण पाहिला. पण अशाप्रकारे शेअरमध्ये उसळी होण्याचं कारणही पुढे आलं आहे. कंपनीनं काही माहिती जाहीर केली होती. 26 जुलै 2023ला कंपनीनं आपल्या पूर्ण मालकीची एक उपकंपनी स्थापन केली. जीनस मिझोरम एसपीव्ही प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. या घोषणेनंतर शेअर नवनवे उच्चांक करत आहे.