Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FSSAI License चे नुतनीकरण करून घ्या, नाही तर भरावा लागेल दंड!

FSSAI License

FSSAI License Renewal: जर तुमच्याकडे FSSAI लायसन्स नसेल आणि तुम्ही जर फूड बिजनेस करत असाल तर तुम्हांला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच या लायसन्सचे वेळेत नुतनीकरण न केल्यास देखील तुम्हांला दंड भरावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊयात काय आहे हे FSSAI लायसन्स आणि फूड बिजनेसमध्ये हे इतके महत्त्वाचे का आहे?

जर तुम्ही हॉटेल व्यावसायिक आहात किंवा इतर स्वरूपात फूड बिजनेस करत असाल तर शासकीय परवाने, स्थानिक पातळीवरील आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रांची पूर्तता वेळच्या वेळी करणे आवश्यक आहे. सोबतच या व्यवसायात अत्यंत महत्वाचे असलेले FSSAI लायसन्सदेखील वेळोवेळी नूतनीकरण घेणे अत्यावश्यक आहे. जर तुमच्याकडे FSSAI लायसन्स नसेल आणि तुम्ही जर फूड बिजनेस करत असाल तर तुम्हांला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच या लायसन्सचे वेळेत नुतनीकरण न केल्यास देखील तुम्हांला दंड भरावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊयात काय आहे हे FSSAI लायसन्स आणि फूड बिजनेसमध्ये हे इतके महत्त्वाचे का आहे?

भारतातील फूड बिजनेस

गेल्या काही वर्षांपासून भारतात फूड बिजनेस मोठ्या प्रमाणात फोफावतो आहे. तरुण वर्ग, गृहिणी, स्टार्टअप्स या व्यवसायात उतरत आहेत. या व्यवसायात कुशल कामगारांना मोठा रोजगार देखील उपलब्ध होताना दिसतो आहे.

चहाचा स्टॉल, कॉफी हाऊस, कॅफे, फास्ट फूड युनिट, छोटे-मोठे फूड कॉर्नर या उद्योगातून मोठा नफा कमवत आहेत. इथे ग्राहकांना थेट खाद्यपदार्थ विकले जात असल्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे फूड बिजनेस मालकाचे आणि सरकारचे देखील कर्तव्य आहे. याचसाठी तुम्हाला अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून (FSSA) उपलब्ध असलेला परवाना (Food License) घेणे अनिवार्य आहे. जर तुम्ही परवाना घेतला असेल, तर त्याचे वेळेवर नूतनीकरण करणे देखील बंधनकारक आहे.

फूड लायसन्सचे नूतनीकरण हे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येते. फूड लायसन्सची वैधता 1 ते 5 वर्षांपर्यंत असते. वैधता संपण्याच्या एक महिना आधी लायसन्सच्या नूतनीकरणासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. लायसन्सची मुदत संपल्यानंतरही जर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू ठेवल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

ऑनलाइन नूतनीकरण कसे कराल?

ऑनलाइन नूतनीकरण करण्यासाठी, FSSAI पोर्टलवर लॉग इन करा. ‘license Renewal’  टॅबवर क्लिक करा आणि तिथे विचारलेली सर्व माहिती द्या. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा. अर्जाची छाननी केल्यानंतर तुमच्या फूड लायसन्सचे नूतनीकरण केले जाईल जे तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून डाउनलोड करता येऊ शकते.

ऑफलाइन नूतनीकरण कसे कराल?

FSSAI नूतनीकरण करायचे असल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयात जावून फॉर्म-ए किंवा फॉर्म-बी भरावा लागेल. हे फॉर्म जिल्ह्याच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून किंवा FSSAI च्या पोर्टलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. यासोबत तुम्हांला आवश्यक ती सर्व माहिती देणे बंधनकारक आहे.परवान्याचे नूतनीकरण करण्यापूर्वी अर्जदाराच्या व्यवसाय स्थळाची देखील तपासणी केली जाते. सर्व मानकांची पूर्तता केल्यानंतर, अर्ज केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत खाद्य परवान्याचे नूतनीकरण तुम्हांला मिळेल.

किती येईल खर्च?

फूड लायसन्स नूतनीकरणाचा दर तुमच्या व्यवसायाच्या वार्षिक उलाढालीच्या आधारे ठरवला जातो. हा खर्च साधारणपणे 100 रुपये ते 7500 रुपयांपर्यंत येतो.

https://foscos.fssai.gov.in/public/assets/docs/KindofBusinessEligibilityLatest.pdf या लिंकवर तुमच्या व्यवसायाचे स्वरूप बघता किती खर्च येईल हे पाहता येईल.