देशातील खासगी क्षेत्रातील फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या (Fincare Small Finance Bank) ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त गुंतवणूक मिळवण्यासाठी एफडीवरील व्याजदरात वाढ (FD Rate Hike) केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार 25 मे 2023 पासून नवीन व्याजदर लागू झाले आहेत. विशेष म्हणजे सामान्य ग्राहकांना एफडीवर 8.51% पर्यंत व्याजदर दिला जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 5000 रुपयांच्या एफडीवर 9.11% व्याजदर देण्यात येत आहे.
Table of contents [Show]
'या' कालावधीसाठी मिळेल इतका व्याजदर
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 36 महिने 1 दिवस ते 42 महिन्यांच्या कालावधीतील एफडीवर सामान्य ग्राहकांना 8.25% व्याजदर देत असून ज्येष्ठ नागरिकांना 8.85 % व्याजदर देत आहे. तसेच 59 महिने 1 दिवस ते 66 महिन्यांमधील एफडीवर सामान्य ग्राहकांना 8%, तर ज्येष्ठ नागरिकांना 8.6% व्याज देत आहे. 66 महिने 1 दिवस ते 84 महिन्यांच्या एफडीतील गुंतवणुकीवर बँकेकडून सामान्य ग्राहकांना 7% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6% व्याज देण्यात येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक व्याजदर 9.11%
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना 1000 दिवसांच्या एफडीवर 9.11% व्याज देण्यात येत आहे. हा व्याजदर एफडीतील गुंतवणुकीमध्ये सर्वाधिक आहे. सामान्य ग्राहकांना 1000 दिवसांच्या एफडीवर 8.51% व्याज देण्यात येत आहे.
एफडी सुविधेचा लाभ घेण्यासाठी...
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या एफडी सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बँकेमध्ये एफडी अकाउंट सुरू करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्राहक बँकेच्या शाखेला भेट देऊ शकतात. किंवा इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल अँप वरून देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
'या' बँकांनी देखील एफडीवरील व्याजदर वाढवला
खासगी क्षेत्रातील सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने (Suryodaya Small Finance Bank) देखील एफडीवरील व्याजदरात नुकतीच वाढ केली आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 9.6% व्याजदर देत आहे. तर युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank) ज्येष्ठ नागरिकांना 9.5% व्याजदर देत आहे.
Source: hindi.moneycontrol.com