ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा जगभरात फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. काळाच्या ओघात फ्रेंडशिप डे साजरा करण्याच्या पद्धतीत बदल होत गेला. शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांपासून ऑफिसमधील, कॉलनीतील, सोसायटींमधील अगदी गावखेड्यात देखील फ्रेंडशिप डेची प्रचंड क्रेझ आहे.
फ्रेंडशिप डेसाठी मित्र मैत्रिणींना गिफ्ट देताना फ्रेंडशिप बॅंडपासून सुरु झालेला हा प्रवास सेटेंड कॅन्डल्स, मेकअप किट्स, परफ्युम, वॉचेस, हेडफोन्स, ब्लुटूथ स्पीकर्स, सन ग्लासेस रेडिमेड क्लोदिंगपर्यंत पोहोचला आहे.
सोशल मिडियावर फ्रेंड्स असले तरी प्रत्यक्षात फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी वन डे आऊटिंगसाठी जाण्याला अनेकांची पसंती आहे. समुद्र किनारी जाणे, हॉटेलिंग, पबमध्ये पार्टी, ट्रेकिंग, हायकिंगचे प्लॅन्स करत तरुणाई फ्रेंडशिप डे साजरा करणार आहे.
टेकच्या जमान्यात तरुणाईसाठी काही हटके गिफ्ट्स आहेत जे तुमच्या फ्रेंड्सला खूश करु शकतात. खिशाला परवडणारे आणि रोजच्या वापरात उपयोगी पडणारे काही पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
Table of contents [Show]
हटके फोन कव्हर
फ्रेंडशिप डेसाठी तुम्ही मित्राला किंवा मैत्रिणीला फोन कव्हर भेट देऊ शकता. हे फोन कव्हर तुम्ही खास जुन्या आठवणींना उजाळा देणारे फोटो प्रिंट करुन देऊ शकता. कस्टम प्रिंटेंड फोन कव्हर सर्वसाधारणपणे 500 रुपयांपासून खरेदी करता येईल.
किंडल ई-बुक
फ्रेंड्सला जर वाचनाची आवड असेल तर किंडल ई-बुक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. थोडा महाग असला तरी हे गिफ्ट तुमच्या मित्रासाठी किंवा मैत्रिणीसाठी फ्रेंडशिप डे खास करुन जाईल. नव्या किंडलमध्ये ई-इंक डिस्प्ले असल्याने यावर दिर्घकाळ वाचन करताना डोळ्यांना कोणताही त्रास होणार आहे. आजच्या घडीला किंडल जगातील सर्वोत्तम ई-बुक रिडर्सपैकी एक आहे.
ब्लुटूथ एअरबड्स
ब्लुटूथ एअरबड्स हा देखील आजच्या घडीला सर्वाधिक डिमांड असलेला गॅझेट्स आहे. फ्रेंडशिप डेला तुम्ही बोट्स, पीट्रॉन, सोनी, जेबीएल, वन प्लस, एअरफन एअर सारख्या ब्रॅंडचे एअरबड्स तुमच्या खास फ्रेंड्स गिफ्ट देऊ शकता.
स्मार्ट ब्लुटूथ ट्रॅकर
आपल्यातील अनेकांना वस्तू विसरण्याची सवय असते. अशांपैकी जर तुमचा खास मित्र असेल तर त्यासाठी मार्केटमध्ये वस्तू विसरण्यापासून अलर्ट करणारे स्मार्ट ब्लुटूथ ट्रॅकर हे डिव्हाईस आहे. हे डिव्हाईस तुम्ही स्मार्टफोनला कनेक्ट करु शकता. जेव्हा तुम्ही वस्तू सोडून दूर जाता जसे की महत्वाची चावी, वॉलेट तेव्हा हे ब्लुटूथ ट्रॅकर फोनवर अलार्म देतो. ज्यामुळे वस्तू सहजासहजी विसरता येत नाही.
स्मार्ट सनग्लासेस
स्मार्ट सनग्लासेस हा स्मार्टफोनशी कनेक्ट होणारा गॉगल आहे. यातून ग्राहकाला उच्च दर्जाचा VR अनुभव मिळतो. या स्मार्ट सनग्लासेसची रेंज 1000 पासून 30 हजार रुपयां दरम्यान आहे.