Cheat people by becoming digital experts: आपला व्यवसाय किंवा आपल्याकडे असलेली कला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची असते, त्यासाठी ऑनलाईन हे सर्वात उत्तम माध्यम मानले जाते. अनेकदा ऑनलाईन प्लॅटफॉरमवरील तांत्रिक बाबी समजत नाहीत, म्हणून डिजिटल मार्केटींग एक्स्पर्टची मदत घेतली जाते. सध्या ऑनलाईनचा इतका बोलबाला त्यामुळे डिजिटल मार्केटींग तज्ज्ञांची गरज मोठ्या प्रमाणात वाढील, मात्र प्रशिक्षित, अनुभवी तज्ज्ञांची संख्याच कमी आहे. अशावेळी, कित्येकांची फसवणूक होते आणि त्यांचे पैसेही वाया जातात.
फेक डिजिटल मार्केटींग एक्सपर्ट हे ऑनलाईन टूलचा वापर करून तर काही पॅनलचा वापर करून तुमचे सोशल मिडिया अकाऊंट, युट्यूब चॅनलचे व्ह्यूज, लाईक, कमेंट्स, सबस्क्राईबर्स वाढवून देतात. याचा फटका भविष्यात त्या अकाऊंटला बसतो, अकाऊंट कधीच मॉनिटाईज होत नाही. तर पॅनलचा वापर केल्यास तरुंगवासही भोगावा लागू शकतो, अनेक सेलिब्रेटीजचे ऑनलाईन मार्केटींग करणाऱ्यांना तीन वर्षांपूर्वी अटक झाली होती.
भुलटे तज्ज्ञ हे नेहमी तंत्राबद्दल बोलतात, कम्युनिटी कनेक्शन, क्रिएटीव्ह आयडिया, काँटेंट मार्केटींग, कॅम्पेनिंग याबद्दल बोलत नाहीत. तर, ते केवळ तुम्हाला एवढ्या दिवसात एवढे सबस्क्राईबर देऊ, एवढे लाईक्स देऊ असेच बोलतात. ते तुम्हाला अवघ्या काही दिवसांमध्येच टार्गेट अचीव्ह करून देतात, त्याबदल्यात जास्तच पैसे आकारतात आणि निघून जातात. त्यानंतर अकाऊंटची जी वाताहत होते, त्याला तुम्हालाच सामोरे जावे लागते, असे डिजिटल मार्केटींग तज्ज्ञ आदित्य पुपाला यांनी सांगितले.
असे फसवले भुलट्या तज्ज्ञाने (This is how the expert cheated)
दोन दिवसांपूर्वीची सत्य घटना, एक शिवडी, भोईवाडा येथे राहणाऱ्या महिलेचे घरगुती केटरींगचा व्यवसाय आहे. त्यांनी आपला व्यवसाय ऑनलाईन आणण्यासाठी युट्यूब चॅनल, वेबसाईट सुरू केली. पुढच्या टप्प्यात त्या फेसबूक, इन्स्टाग्रॅम सुरू करणार होत्या. त्यांनी जेमतेम रेसिपीजचे 10 व्हिडीओ युट्यूबवर शेअर केले, त्यांना तब्बल 2 लाख व्ह्यूज मिळाले, त्या खुश झाल्या आणि त्यांनी ठरलेली रक्कम डिजिटल मार्केटींग एक्सपर्टला दिली. वेबसाईटही त्याने बनवून दिली, त्यावर ही मजकूर टाकून दिला. मात्र, पैसे घेतल्यावर त्या व्यक्तीशी काँटॅक्टच झाला नाही. तो व्यक्ती गायब झाला. मग, या बाई माझ्याकडे मार्केटींगचा सल्ला मागण्यासाठी आल्या, कारण युट्यूबने त्यांचे चॅनल बॅन केले, त्यांची वेबसाईटही बंद पडली. कारण वेबसाईट कोणत्यातरी बेभरवशाच्या प्लॅटफॉर्मवरुन होस्ट केली होती, डोमेनही असेच कुठूनतरी विकत घेतलेले होते. त्यामुळे बाईंची तब्बल 40 हजारांना फसवणूक झाली होती. पती नसलेली ही महिला, तिच्या दोन मुलांसह शिवडी येथे राहते, गेल्या 10 वर्षांपासून स्वत:चा व्यवसाय सांभाळत आहे, मात्र तिच्यासोबत असा प्रकार घडला, ही सत्य घटना पुपाला यांनी इतर वाचकांना समजावे आणि त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून त्या महिलेची परवानगी घेऊन सांगितली आहे. त्या महिलेने आपले नाव लिहिण्यास परवानगी दिली नाही.
फसवणूक होऊ नये म्हणून काय करावे (What to do to avoid being cheated)
भुलट्या डिजिटल मार्केटींग तज्ज्ञांपासून सावध राहिले पाहिजे, अधिक तांत्रिक बाबींमध्ये न जाता, क्रिएटीव्ह मुद्द्यांवर बोलले पाहिजे. तांत्रिक बाबी गुगलवरुन समजून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, मात्र आपल्याला काही कळत नाही तर हो.. हो म्हणून अनेकदा व्यक्ती फसतात. तुम्ही क्रिएटीव्ह काँटेंटवर फोकस करा, डिजिटल मार्केटींग स्वत: शिका म्हणजे तुम्हीच तुमचे काम करू शकाल. जर वेळ नसेल, जी व्यक्ती तुम्ही निवडत आहात, तिच्याविषयी सोशल मिडयावर सर्च करा, त्यांना त्यांच्या आधीच्या क्लाएंटचा नंबर देण्यास सांगा त्यांच्याशी बोला किंवा त्यांच्या सोशल मिडियावर नेमके काय कॅम्पेन केले ते पाहून घ्या, म्हणजे त्यांच्यावर विश्वास बसला की पुढची बोलणी करून काम करा. तसेच पैसे देण्याची तारीख नक्की करा, काम आवडले म्हणून लगेच देऊ नका किंवा टार्गेट लवकर पूर्ण झाले तरिही देऊ नका, तसेच त्या व्यक्तीचे अल्टरनेट काँटॅक्ट नंबर घेऊन ठेवा. अशा गोष्टी फॉलो केल्याने फसण्याची शक्यता नक्कीच कमी होईल, असे पुपाला यांनी सांगितले.