If you are thinking of earning money by working online then read this first: तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर ही ऑनलाईन ट्रीक वापरा आणि भरघोस पैसे कमवा असे मेसेज, जाहिराती सतत सोशल मिडियावर दिसत असतात. त्यात पैसे कोणाला कमवायचे नसतात, सोशल मिडिया किंवा ओटीटीवर सहज काही तास जातात, त्याऐवजी ऑनलाईनच छोटे-मोठे टास्क पूर्ण करून पैसे कमावता येत असतील तर काय वाईट आहे, करूया असे म्हणून अनेकजण त्या ऑनलाईन कमाई करण्याच्या कार्यक्रमात एनरोल होतात आणि नंतर ते महिनों महिने टास्क करत राहतात पण पॉईंट्स मिळतात, पैसे कधीच अकाऊंटला जमा होत नाहीत. काहिवेळा तर टास्क करणाऱ्यांकडून पैसे घेतले जातात आणि नंतर टास्क देणारी व्यक्ती, तो प्लॅटफॉर्म सगळे गायब होऊन जाते, अशाप्रकारे नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जाते.
नुकताच, स्टॅटेस्टिका या रिसर्च कंपनीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात त्यांनी ऑनलाईन सर्व्हेक्षण घेतले होते. त्यांची सँपल साईज 30 हजार होती. 30 हजार व्यक्तींनी सर्व्हेक्षणाला प्रतिसाद देऊन, प्रश्नांची उत्तरे दिली. त्यातून असा निष्कर्ष निघाला की जवळपास 42 टक्के व्यक्तींची ऑनलाईन काम देणाऱ्यांकडून फसवणूक झाली आहे. ही फसवणूक दोन प्रकरे झाली आहे. एक तर एनरोलमेंट फी घेऊन पसार झाले तर दुसरा प्रकार म्हणजे काम करून पैसे कधीच मिळाले नाहीत.
व्हिडीओ पाहून पैसे कमवा या प्रकारात नागरिकांची सर्वाधिक फसवणूक झाल्याचे आढळले आहे. तब्ब्ल 65 टक्के व्यक्तींची फसवणूक यात झाली आहे. व्हिडीओ तर इन्स्टाग्रॅम, युट्यूबवर पाहतो तर इथे पाहू असे म्हणून असे काम घेतात, मात्र पैसे मिळत नाहीत. या जाहिरांतींमध्ये एक व्हिडीओ पाहण्याचे 50 रुपये, 30 रुपये असे लिहिलेले असते. जर यात पुढे टास्क पूर्ण करत राहिलात तर महिन्याला 15 ते 20 हजाप कमावता येतील, असे लिहिलेले असते म्हणूनही व्यक्ती यात फसतो.
व्हिडीओ बघून पैसे कमवा (Earn money by watching videos)
मुख्यत्त्वे फसवणूक व्हिडीओ बघून पैसे कमवा या कामाद्वारे झाली आहे. यात, विविध व्हिडीओ बघण्यासाठी प्लॅटफॉर्म म्हणजे अॅप बनवलेले असते. त्यात एकामागोमाग एक व्हिडीओज येत असतात, ते पाहायचे. त्याचे पॉईंट जमा होणार, विशिष्ट पॉईंट झाले की तुम्ही जोडलेल्या बँक अकाऊंटला सर्व पैसे जमा होणार, व्यक्ती व्हिडीओ बघण्याचे दिलेले रोजचे टार्गेट पूर्ण करते, सलग अनेक दिवस करते मात्र त्यातून काहीच कमाई होत नाही, उलट वेळ वाया जातो.
आयटी इंजिनियर अमित नायर सांगतात की, व्हिडीओ पाहण्याचे टास्क देणारे ऑनलाईन कमाईचे काम हे बहुतांशवेळा फसवे असते. यात एक तर त्या व्यक्तीचेच युट्यूब चॅनलवरील व्हिडीओज असतात, जेणेकरून त्याला व्ह्यूज मिळून चॅनल मॉनिटाईज व्हावे यासाठी हे केलेले असते. तर काहीवेळा डिजिटल मार्केटरच्या नावाखाली असे अॅप बनवून त्यात विविध व्यक्तींकडून युट्यूब मॅनेज करण्याची कामे घेतात, यात त्यांना ऑरगॅनिक व्ह्यूज मिळवून देण्यासाठी हे काम करतात. अशाप्रकारे अॅपवर व्हिडीओ दाखवून मॉनिटाईज झालेले चॅनलही युट्यूबने बॅन केले आहेत. हा फसवा प्रकार आहे. यात युट्यूबच्या नियमांचे उल्लंघन होते. तर ज्या कंपन्या विकत व्ह्यूज देतात, त्यांची पद्धत वेगळी आहे, ते मार्केटींग करून त्यांचे व्ह्यूज नैसर्गिकरित्या वाढवतात, मॅन्युप्युलेट करून व्ह्यूज वाढत नाहीत. त्यामुळे व्हिडीओ बघून पैसे कमवा या जाहिरातींपासून सावध राहा.
ऑनलाईन पैसे कमावण्याचे अनेक पर्याय आहेत. मात्र ते सर्व पर्याय, तो प्लॅटफॉर्म याबद्दल गुगलवर सर्च करा, सोशल मिडियावर सर्च करा, तसेच विविध कम्युनिटीवर त्याबाबत विचारपूस करा, मगच अशा कमाई करण्याच्या प्लॅटफॉर्मवर नाव एनरोल करा, असेही नायर यांनी सांगितले.