वर्ष 2022 मधील शेवटच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) 2950.89 कोटींचे शेअर्स विक्री केले. ज्याचा परिणाम शेअर मार्केटवर दिसून आला. (FPI sold shares worth Rs.2950.89 crore on Dec 30) सेन्सेक्स आणि निफ्टीत शुक्रवारी घसरण झाली. शुक्रवारी 30 डिसेंबर 2022 रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली होती. वर्षाच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 293 अंकांनी आणि निफ्टी 86 अंकांच्या घसरणीसह स्थिरावला होता.
मागील आठवड्यात शेअर मार्केटमधील पडझडीमागे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकादार कारणीभूत ठरले. एकीकडे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री करुन गुंतवणूक काढून घेतली तर दुसऱ्या बाजूला स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदीकरुन बाजार सावरण्याचा प्रयत्न केला. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) शुक्रवारच्या सत्रात 2266.2 कोटींचे शेअर्स खरेदी केले. (DII bought shares worth Rs 2266.2 crore)
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2022 मध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एकूण 14231.09 कोटींचे शेअर्स विक्री केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार मात्र शेअर मार्केटसाठी तारणहार ठरले. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी डिसेंबर 2022 मध्ये 24159.13 कोटींचे शेअर्स खरेदी केले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवरुन परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण ठरते.
गेल्या आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने चांगली कामगिरी केली. निफ्टीने त्याआधीच्या आठवड्यात झालेल्या घसरणीची 50% भरपाई केली. गेल्या आठवड्यात शेअर इंडेक्सचा RSI 14 होता. 50 EMA आणि 200 EMA हा सकारात्मक होता. अल्प कालावधीसाठी निफ्टी 17800 राहील. वरच्या पातळीचा विचार केला तर निफ्टी 18350 अंकांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज एलकेपी सिक्युरिटीजचे शेअर बाजार विश्लेषक रुपक दे यांनी व्यक्त केला. नजीकच्या काळात निफ्टी 18600 ते 19000 च्या दरम्यान राहील, असे त्यांनी म्हटले आहे.