Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flipkart Smartphone Deal: 'या' ठिकाणी Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोनवर मिळतोय 20 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

Flipkart Smartphone Deal

Flipkart Smartphone Deal: तुम्हाला देखील सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर 'Samsung Galaxy M14 5G' हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. ऑनलाईन रिटेल वेबसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart) ग्राहकांना या मोबाईलच्या खरेदीवर 20 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.

अनेक नामांकित स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक म्हणजे सॅमसंग (Samsung). भारतातील मोठा वर्ग हा सॅमसंग स्मार्टफोनचा वापरकर्ता आहे. Samsung Galaxy M14 5G हा फोन सतत ट्रेंडमध्ये असतो. जर तुम्हाला देखील हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते. ऑनलाईन रिटेल वेबसाईट फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर 20 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यासोबतच बँकेच्या अनेक ऑफर्स देखील मिळणार आहेत. या ऑफर्स आणि डिस्काउंट मिळाल्यानंतर हा फोन ग्राहकांना अगदी माफक किंमतीत खरेदी करता येणार आहे. चला तर याबद्दल सविस्तर माहिती करून घेऊयात.

फ्लिपकार्टवर मिळतोय 'इतका' डिस्काउंट

‘Samsung Galaxy M14 5G’ हा स्मार्टफोन सध्या ऑनलाईन रिटेल वेबसाईट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याठिकाणी या फोनची किंमत 17,990 रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर फ्लिपकार्टकडून ग्राहकांना 19 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट पकडून Samsung Galaxy M14 5G ग्राहकांना केवळ 14,399 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

बँक ऑफर्सबाबत जाणून घ्या

हा स्मार्टफोन ग्राहकांना EMI स्वरूपात खरेदी करता येणार आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (HDFC Bank Credit Card) हा स्मार्टफोन खरेदी केल्यावर ग्राहकांना EMI Transaction वर 1250 रुपयांचा त्वरित डिस्काउंट दिला जाणार आहे. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना कोणतीही एक्सचेंज ऑफर मिळणार नाही. मात्र ऑर्डर केल्यानंतर केवळ एका दिवसात या फोनच्या डिलिव्हरीची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.

फीचर्सबाबत जाणून घ्या

Samsung Galaxy M14 5G या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 6.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय Octa Core 2.4GHz चा प्रोसेसर दिला आहे.

या फोनमध्ये दोन स्टोरेज पर्याय उलपब्ध आहेत. ज्यात  4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP चा बँक कॅमेरा दिला गेला आहे.

6000mAh क्षमता असलेली बॅटरी यामध्ये दिली आहे. ज्यामुळे दीर्घकाळ फोन युजरला वापरता येणार आहे.

ड्यूअल सिम कार्ड, 5G नेटवर्क आणि 1 वर्षाची वॉरंटी कंपनीकडून देण्यात येत आहे. तर 6 महिन्यांची Accessories वॉरंटी दिली जात आहे.

हा फोन तीन वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये berry blue, ICY Silver आणि Smokey Teal हे रंग उपलब्ध आहेत.

Source: navbharattimes.indiatimes.com