तुम्हाला देखील फोटोग्राफीची आवड आहे का? जर असेल आणि तुम्ही परवडणाऱ्या किंमतीत चांगला कॅमेरा असणारा स्मार्टफोन शोधत असाल, तर ‘Realme 11 Pro 5G’ हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. हा 5G स्मार्टफोन असून यामध्ये अनेक नवनवीन फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या फोनची फ्लिपकार्टवर 25,999 रुपये किंमत आहे. मात्र वेगवेगळे डिस्काउंट आणि बँक ऑफर्सचा लाभ घेऊन हा फोन केवळ 799 रुपयांना खरेदी करता येणार आहे. नेमक्या काय ऑफर्स आहेत? त्याचा लाभ कसा घ्यायचा, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
फ्लिपकार्टवर मिळतोय 'इतका' डिस्काउंट
ऑनलाईन रिटेल वेबसाईट फ्लिपकार्टवरून ग्राहकांना ‘Realme 11 Pro 5G’ हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. या फोनची फ्लिपकार्टवर किंमत 25,999 रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर फ्लिपकार्टकडून 7 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. या डिस्काउंटसह हा फोन ग्राहकांना 23,999 रुपयांना खरेदी करता येईल.
बँक ऑफर्सबाबत जाणून घ्या
‘Realme 11 Pro 5G’ या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना अनेक वेगवेगळ्या बँक ऑफर्स (Bank Offers) देण्यात येत आहेत. ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (HDFC Bank Credit Card) खरेदी केल्यावर त्यांना त्वरित 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय हा फोन ग्राहक EMI सुविधेसह खरेदी करू शकतात. मासिक 4000 हजार रुपयांचा EMI भरून ग्राहक या फोनची खरेदी करू शकतात. त्याशिवाय एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवरून (SBI Ban Credit or Debit Card) फोनची खरेदी केल्यावर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
799 रुपयांमध्ये फोन कसा खरेदी करता येईल?
‘Realme 11 Pro 5G’ या फोनवर फ्लिपकार्टकडून एक्सचेंज ऑफर (Exchange Offer) देण्यात येत आहे. ही एक्सचेंज ऑफर्स 22,800 रुपयांची आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला, तर तुम्हाला हा फोन केवळ 799 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हा एक्सचेंज डिस्काउंट तुम्ही दिलेल्या स्मार्टफोनच्या स्थितीवर देण्यात येईल. ही किंमत कमी किंवा जास्त होऊ शकते.
'Realme 11 Pro 5G' चे फीचर्स जाणून घ्या
Realme 11 Pro 5G या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.7 इंचाचा आहे. यामध्ये Dimensity 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी विशेष 100MP आणि 2MP चे दोन बॅक कॅमेरे देण्यात आले आहेत. तसेच सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
या फोनची बॅटरी 5000mAh क्षमतेची आहे. ज्यामुळे ती दीर्घकाळ टिकते. यामध्ये दोन सिमकार्ड बसवण्याची सुविधा देण्यात आली आहे.
या फोनमध्ये दोन कलर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यामध्ये Astral Black आणि Sunrise Beige यांचा समावेश आहे.
Source: navbharattimes.indiatimes.com