Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flipkart Smart TV Deal: LG कंपनीचा 'हा' स्मार्ट टीव्ही फक्त 3 हजारात खरेदी करता येणार; कसा, जाणून घ्या

Flipkart Smart TV Deal

Image Source : www.lg.com

Flipkart Smart TV Deal: तुम्हाला देखील स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल, तर तुम्ही फक्त 3 हजारात तो खरेदी करू शकता. ऑनलाईन रिटेल वेबसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart) यासंदर्भात ऑफर देण्यात येत आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

आजकाल प्रत्येकाच्या घरात आपल्याला स्मार्ट टीव्ही (Smart TV) पाहायला मिळत आहेत. या एकाच टीव्हीचा वापर कॉम्प्युटर, गेमिंग मॉनिटर आणि वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. त्यामुळे स्मार्ट टीव्हीच्या किंमती देखील सर्वात जास्त आहेत. जर तुम्हाला देखील स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल, तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. केवळ 3 हजारात तुम्ही LG कंपनीचा स्मार्ट टीव्ही घरबसल्या खरेदी करू शकता. ऑनलाईन रिटेल वेबसाईट फ्लिपकार्ट (Flipkart) आपल्या ग्राहकांना ही खास ऑफर देत आहे. जवळपास 22 हजार किंमत असलेला हा टीव्ही ग्राहक फक्त 3 हजारात खरेदी करू शकतात. तो कसा, जाणून घेऊयात.

फ्लिपकार्टवर मिळतोय 'इतका' डिस्काउंट

ऑनलाईन रिटेल वेबसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart) ग्राहकांना LG कंपनीचा LG 80cm HD Ready LED Smart WebOS TV  हा स्मार्ट टीव्ही खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टवर या टीव्हीची किंमत 21,990 रुपये आहे. ज्यावर फ्लिपकार्ट कडून 36% डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट पकडून या टीव्हीची किंमत 13,990 रुपये होते.

बँक ऑफर्स जाणून घ्या

LG कंपनीच्या या स्मार्ट टीव्ही खरेदीवर ग्राहकांना वेगवेगळ्या बँक ऑफर्स देण्यात येत आहेत. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (HDFC Bank credit card) ग्राहकांनी हा टीव्ही खरेदी केला, तर त्यांना 500 रुपयांचा त्वरित डिस्काउंट देण्यात येत आहे. त्याशिवाय EMI स्वरूपात हा टीव्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केला, तर 10% डिस्काउंट मिळणार आहे.

3 हजारात टीव्ही कसा मिळेल?

फ्लिपकार्टवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफर (Exchange offer) देण्यात येत आहे. ग्राहक जुना टीव्ही एक्सचेंज करून त्यावर 11 हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट मिळवू शकतात. हा डिस्काउंट आणि 36% फ्लिपकार्टकडून देण्यात येणारा डिस्काउंट पकडून ग्राहकांना हा टीव्ही केवळ 3 हजारात खरेदी करता येणार आहे.मात्र हा एक्सचेंज डिस्काउंट टीव्हीच्या कंडिशनवर देण्यात येईल. त्यामुळे ही किंमत कमी देखील होऊ शकते.

स्मार्ट टीव्हीचे फीचर्स जाणून घ्या

LG कंपनीचा HD Ready LED Smart WebOS स्मार्ट टीव्ही 32 इंचाचा (80 सेमी) आहे. या टीव्हीचा कलर Ceramic Black असून LED स्क्रीन टाईप आहे.

यामध्ये HD Ready तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच या टीव्हीला USB, Wi-Fi आणि HDMI कनेक्शन देण्यात आले आहे.

LG चे हे मॉड्युल 2020 साली लॉन्च करण्यात आले होते. याचा टीव्ही अँगल हा 178 डिग्री असून 1 वर्षाची वॉरंटी देण्यात येत आहे.

या टीव्हीला नेटफ्लिक्स (Netflix), प्राईम व्हिडीओ (Prime Video), हॉटस्टार (Hotstar) आणि युट्युब (YouTube) सपोर्ट करण्यासाठी मदत करेल.

Source: navbharattimes.indiatimes.com