Investment in FD: कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅनकार्ड हे एक खूप महत्त्वाचे ओळखपत्र आहे. इन्कम टॅक्स विभागाकडे आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर पॅनकार्ड वितरित करण्यात येते. पॅनकार्डवरून कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीची माहिती मिळते. पॅनकार्डवरील 10 आकडी नंबर प्रविष्ट केल्यास संबंधित व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील मिळू शकतो.
एफडी खाते उघडण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य
बँकेत FD करण्यासाठी पॅन कार्ड हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. केंद्र सरकारने 2020-21 मध्ये वित्त विधेयकातून याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव संसदेत मान्य केल्यानंतर, मुदत ठेवींसाठी पॅनकार्ड बंधनकारक केले होते. 50 हजारांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असतील तर बँक, पोस्ट ऑफिस किंवा नॉन-बँकिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना पॅनकार्ड जमा करणे आवश्यक आहे.
एफडीवर व्याज म्हणून भरावी लागेल दुप्पट रक्कम
एफडीवरील व्याज एका वर्षात 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास, इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 194A नुसार त्यावर 10% दराने टीडीएस कापण्यात येतो. गुंतवणूकदाराने या ठेवीत गुंतवणूक करतांना पॅनकार्ड जमा केले असेल. तर त्या मुदत ठेवीतून 20% रक्कम कापून घेतली जाते. मुदत ठेवींमधील सवलतीबद्दल सांगायचे झाले तर ज्येष्ठ नागरिकांना यासाठी सूट देण्यात आली आहे. त्यानुसार 50,000 रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त असेल. जर तुम्हाला मिळालेल्या व्याजाच्या रकमेवर बँकेने TDS कापला असेल, तर इन्कम टॅक्स रिटर्न भरताना त्यावर दावा केला जाऊ शकतो.
FD वर कर मोजण्याची पद्धत
मुदत ठेवींमधील गुंतवणूकीवर टॅक्स आकारण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे. दरवर्षी तुमच्या वार्षिक उत्पन्नात मुदत ठेवींमधून मधून मिळणारे व्याज जोडले जाते. बँक हे व्याज वार्षिक किंवा मुदत संपल्यावर देते. परंतु दरवर्षी तुम्हाला ITR फाईल करताना या व्याजाचा उल्लेख करावा लागतो. कारण दरवर्षी त्यावर TDS कापला जातो. तुमच्याकडे 3 वर्ष मुदतीची FD असल्यास दरवर्षा अखेरीस TDS कापला जातो. मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज असे दोन्ही मिळते.
Source - www.economictimes.com