नवीन युगातील तंत्रज्ञान भारतीयांनी नेहमीच स्वीकारले आहे. भारतातील शेतकरी देखील याबाबतीत कुठेही मागे नाही. ट्रॅक्टरपासून इतर पेरणी यंत्रापर्यंत शेतकऱ्यांनी सर्व नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. त्याचबरोबर वाहन व वाहतूक क्षेत्रापासून शेतकरी काही अपरिचित नाहीत. यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेने दुचाकी व चारचाकी वाहनांसह इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा देखील शेती उद्योगावर प्रभाव दिसून येतो. भारतात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत 5-6 लाख रुपयांपासून सुरू होते, जी भारतीय शेतकऱ्यांसाठी वाजवी किंमत आहे.
पारंपारिक ट्रॅक्टरपेक्षा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर का घ्यावे?
- पारंपारिक ट्रॅक्टरला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर प्रदूषण कमी करतो.
- इलेक्ट्रिक ट्रॅक्टर रिचार्ज करण्यायोग्य इलेक्ट्रिक बॅटरीवर चालतात.
- काही इलेक्ट्रिक ट्रॅक्टर फक्त चार ते पाच तासांमध्ये चार्ज होतात.
- हे ट्रॅक्टर डिझेल आणि गॅसोलिनवर कमी अवलंबून असतात. त्यामुळे पर्यावरणातील हानिकारक उत्सर्जन कमी होते व पैशांची बचत होते.
- सध्या या ट्रॅक्टरची किंमत भारतीय शेतकऱ्यांना परवडणारी आहे.
- हे तांत्रिकदृष्ट्या प्रगत ट्रॅक्टर आधुनिक शेतीचे भविष्य आहेत.
- या ट्रॅक्टर्स मध्ये देखभाल खर्च देखील फार कमी असतो. त्यांना वारंवार देखभाल व दुरुस्तीची जास्त काही आवश्यकता नसते.
- इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चार्ज करण्यासाठी सौर उर्जेचा देखील वापर करू शकता, ज्यामुळे तुमचा विजेचा खर्च देखील वाचू शकतो.
इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स त्यांचे फिचर्स आणि किंमती
- सोनालिका टायगर इलेक्ट्रिक:
फिचर - 15 HP
किंमत - Rs. 6.40 ते 6.72 लाख रूपये - HAV 45 S1:
फिचर - 44 HP
किंमत - 8.49 लाख रूपये व त्यापुढे - HAV 50 S1:
फिचर - 42 HP
किंमत 9.99 लाख रूपये - Autonxt X45H2:
फिचर - 45 HP
किंमत - अद्याप उघड केलेले नाही - Cellestial 55 HP:
फिचर - 55 HP
किंमत - अद्याप जाहीर केलेली नाही.
एकूणच हे ट्रॅक्टर परवडणारे आणि बॅटरीवर चालणारे असून ते सुरक्षित आरोग्यदायी आणि भविष्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.