Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV Charging Station : तुमच्या EV साठी चार्जिंग स्टेशन शोधायला हे फ्री अ‍ॅप्स करतील मदत, वाचा सविस्तर

EV Charging Station : तुमच्या EV साठी चार्जिंग स्टेशन शोधायला हे फ्री अ‍ॅप्स करतील मदत, वाचा सविस्तर

EV Charging Station : सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकलची (EV) चलती मोठ्या प्रमाणावर आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच EV साठी लागणाऱ्या विजेत तीन पटीने मागणी वाढली असल्याची माहिती महावितरणने दिली होती. त्यामुळे तुम्ही EV घेतली असल्यास किंवा घेतल्यानंतर तिचे चार्जिंग स्टेशन माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही फ्री अ‍ॅप घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला चार्जिंग स्टेशनची माहिती देतील.

EV Charging Station : EV मुळे पर्यावरणपूरक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. हे खरे असेल तरी, सध्याच्या घडीला चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर हा सर्वात मोठा अडथळा EV उद्योगांसमोर आहे. मात्र, EV निर्माते आणि खासगी इलेक्ट्रिक सेवा पुरवणारे चार्जिंग स्टेशनचे स्वतःचे नेटवर्क तयार करत आहे. त्यामुळे लोकांचा चार्जिंग स्टेशनचा प्रश्न सुटल्यावर EV चा खप वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत तुम्ही महत्वाच्या कामासाठी बाहर पडला आणि तुमच्या EV ची बॅटरी संपली तर काय? यासाठी आम्ही काही फ्री अ‍ॅप्स घेऊ आलो आहोत, जे तुमच्याजवळ असेलेल्या चार्जिंग स्टेशनची तुम्हाला माहिती देतील.

Google मॅप्स

गुगल मॅप्सवरून EV चार्जिंग स्टेशन शोधणे सर्वात सोपं काम आहे. यावर तुम्ही जवळील चार्जिंग स्टेशन टाकले, तर लगेच तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील जवळ असलेले सर्व चार्जिंग स्टेशन दिसतील. तसेच, गुगल तुम्हाला चार्जिंग स्टेशनची रेटिंग आणि तेथील चार्जर्सची संख्या ही दाखवेल. त्यामुळे वाहन चालकांना बराच फायदा होऊ शकते. पण, चार्जिंग स्टेशनवरचे स्टेट्स पाहता येणार नाही.

फर्स्ट पार्टी अ‍ॅप

चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी तुम्ही फर्स्ट पार्टी अ‍ॅपचा ही वापर करु शकता. जेव्हा तुम्ही EV खऱेदी करता, त्यावेळी वाहन विक्रेता तुम्हाला या अ‍ॅपविषयी माहिती देतो. कारण, यामध्ये वाहनाची आणि तुमच्या जवळच्या चार्जिंग स्टेशनची माहिती असते. त्यामुळे या अ‍ॅपमध्ये फक्त वाहन कंपनीच्या चार्जिंग स्टेशनची आणि त्यांच्या पार्टनरचीच माहिती असू शकते. उदाहरणासाठी, तुमच्याजवळ जर Ather ची EV असेल तर तुम्हाला Ather अ‍ॅप डाउनलोड आणि इन्स्टाॅल करावे लागेल. त्यामुळे ज्या कंपनीची EV असेल ते त्यांच्याच चार्जिंग स्टेशनची माहिती देतील. तसेच, त्यांचे चार्जिंग पाॅईंट्स ही वेगळे असू शकतात. यामुळे दुसऱ्या EV ना चार्ज करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला कोणते स्टेशन तुमच्या बजेटात आहे तेही पाहवे लागेल. अशावेळी तुम्ही खरेदी केलेल्या EV चा अ‍ॅप वापरणे योग्य ठरते.

EV Plugs

EV Plugs देशातील सर्वात मोठ्या चार्जिंग नेटवर्क एग्रीगेटर्सपैकी एक असून यांचे एक हजारपेक्षा जास्त चार्जिंग पॉईंट्स आहेत. या अ‍ॅपमध्ये टाटा पॉवर (Tata Power), मजेंटा (Magenta) आणि ईईएसएल (EESL) सारख्या सर्व प्रमुख ऑपरेटर्सच्या चार्जिंग पॉईंट्सच्या यादीचा समावेश आहे. अ‍ॅपमध्ये, युझर्स त्यांची EV निवडून त्यांच्या जवळ असलेले चार्जिंग पॉईंट्स शोधू शकतात. त्यामुळे या अ‍ॅपचा फायदा बऱ्याच EV च्या मालकांना होत आहे.

टाटा पॉवर EZ चार्ज

हे अ‍ॅप टाटा पॉवरचे असून याची देखभाल आणि EV चार्जिंग पाॅईंटसमध्ये अ‍ॅक्सेस टाटा पॉवरकडूनच दिला जातो. या अ‍ॅपमध्ये चार्जिंग कनेक्टरचा प्रकार, चार्जिंग पाॅईंट्सचे स्टेट्स यासह सर्व डिटेल्स अ‍ॅपमध्ये पाहता येतात. तसेच, यामध्ये विशिष्ट मुदतीसाठी चार्जिंग स्लाॅट बुक करण्याचा पर्यायही आहे. याशिवाय याच अ‍ॅपवरून तुम्हाला पेमेंटही करता येणार आहे. विशेष म्हणजे हे अ‍ॅप फक्त इलेक्ट्रिक कारसाठीच आहे. त्यामुळे कारच्या मालकांना याचा फायदा होऊ शकतो.