तुम्ही फेडरल बॅंकेचे ग्राहक असल्यास तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण, फेडरल बॅंकेने त्यांच्या व्याजदरात बदल केले आहेत. त्यानुसार काही मुदतीत सामान्य नागरिकांना 3 ते 7.30 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.80 टक्के व्याजदर दिल्या जात आहे. हे नवीन दर 21 सप्टेंबरपासून लागू आहेत.
एफडीच्या व्याजदरात बदल
फेडरल बँकेने 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीच्या व्याजदरात बदल केला आहे. यामुळे बँकेने 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीवरील एफडीच्या दरात वाढ केल्याचे दिसून येत आहे. सामान्यांसाठी एफडीवरील व्याजदर 3 टक्के ते 6.60 टक्क्यांपर्यंत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.25 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे.
फेडरल बॅंकेचे नवे दर
तुम्ही जर फेडरल बॅंकेत एफडी करत असल्यास बॅंक सामान्य नागरिकांना 7 दिवस ते 29 दिवसाच्या एफडीवर 3.00 टक्के व्याज देत आहे. तेच, 181 दिवस ते 270 दिवसांच्या एफडीवर 5.75 टक्के मिळणार आहे. बॅंक सर्वात जास्त 13 महिने ते 21 महिन्याच्या एफडीवर 7.30 टक्के व्याज देत आहे. याचबरोबर बॅंक 2 वर्ष ते 3 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर 7.05 टक्के व्याज देत आहे. तसेच, तुम्ही जर पाच वर्ष आणि त्यापेक्षा जास्त अवधीसाठी एफडी करत असल्यास बॅंक तुम्हाला 6.60 टक्के व्याजदर देत आहे.
बॅंक ज्येष्ठ नागरिकांना ही एफडीवर जबरदस्त रिटर्न देत आहे. 7 दिवस ते 29 दिवसाच्या एफडीवर 3.50 टक्के व्याज देत आहे. तर, 181 दिवस ते 270 दिवसांच्या एफडीवर 6.25 टक्के मिळत आहे. बॅंक सर्वात जास्त 13 महिने ते 21 महिन्याच्या एफडीवर म्हणजेच 7.80 टक्के व्याज देत आहे. याशिवाय बॅंक 2 वर्ष ते 3 वर्षापेक्षा कमी मुदतीच्या एफडीवर 7.55 टक्के व्याज देत आहे. याशिवाय, तुम्ही जर पाच वर्ष आणि त्यापेक्षा जास्त अवधीसाठी एफडी करत असल्यास बॅंक तुम्हाला 7.25 टक्के व्याजदर देत आहे. हे नवीन दर बॅंकेच्या वेबसाईटनुसार असून 21 सप्टेंबरपासून लागू आहेत.
बॅंकेविषयी थोडक्यात
फेडरल बॅंक ही भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बॅंक असून देशभरात बॅंकेच्या 1385 शाखा आहेत. तसेच, बॅंकेच्या एटीएमचे नेटवर्क सर्वदूर पसरलेले असून 1,918 बॅंक एटीएम आहेत. याशिवाय 30 जून 2023 पर्यंत बँकेचे एकूण बिझनेस कॉम्बिनेशन (डिपॉझिट प्लस अॅडव्हान्स) 4.06 लाख कोटी रुपये होते. तसेच, बॅंकेचा CRAR (Capital Adequacy Ratio) 14.28 टक्के होता.