Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wheat Crop: गहू पिकावर उष्णतेच्या लाटेचा परिणाम; हवामान खात्याकडून इशारा

Wheat prices

मागील काही महिन्यांपासून देशात गव्हाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अनेक प्रजातींच्या बाजारातील गव्हाची किंमती 3 हजार रुपये क्विंटलच्या पुढे आहे. तर प्रिमियम क्वालिटीचा गहू साडेतीन हजारांच्याही पुढे आहे. दरम्यान, या रब्बी हंगामात गव्हाचे भरघोस उत्पन्न होण्याची आशा शेतकऱ्यांसह सगळ्यांना लागली आहे.

Wheat Crop: मागील काही महिन्यांपासून देशात गव्हाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अनेक प्रजातींच्या बाजारातील गव्हाची किंमती 3 हजार रुपये क्विंटलच्या पुढे आहे. तर प्रिमियम क्वालिटीचा गहू साडेतीन हजारांच्याही पुढे आहे. दरम्यान, या रब्बी हंगामात गव्हाचे भरघोस उत्पन्न होण्याची आशा शेतकऱ्यांसह सगळ्यांना लागली आहे. मात्र, उष्णतेच्या लाटेमुळे गहू पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

उष्णतेच्या लाटेचा गव्हावर परिणाम (Heat wave impact on Wheat)

मंगळवारी India Meteorological Department (IMD) ने शेतकऱ्यांसाठी सूचना जारी केली आहे. प्रमाणापेक्षा जास्त तापमानाचे गहू पिकावर काय परिणाम होऊ शकतात याबाबत शेतकऱ्यांना सावध केले आहे. " सध्या दिवसा तापमानाचा पारा प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्याचा परिणाम गव्हावर जास्त होऊ शकतो, कारण गहू पिक वाढीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. या काळात गव्हाच्या ओंबीमध्ये दाणा असल्याने हा काळ पिकांसाठी संवेदनशील असतो. या काळातील जास्त तापमानाचा परिणाम गव्हाच्या उत्पादइनावर होऊ शकतो. गव्हाशिवाय इतरही पिके आणि हॉर्टिकल्चर पिकांवर उन्हाचा परिणाम होऊ शकतो, असे या सूचनेत म्हटले आहे.

गहू हे रब्बी पिक प्रामुख्याने ज्या राज्यांमध्ये घेतले जाते, त्या राज्यांमधील तापमान 3 ते 5 अंशांनी जास्त आहे. गुजरात महाराष्ट्र राज्यात तापमान 35-39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे, असे हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी म्हटले. उत्तर-पश्चिम, मध्य आणि पश्चिम भारतामधील तापमान अधिक असल्याचेही IMD ने म्हटले आहे.

मागील वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादनावर परिणाम( 2022 impact of heat wave on Wheat Crop)

भारतामध्ये 2022 साली उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाचे उत्पादन कमी झाले होते. त्याचा परिणाम देशभर गव्हाच्या किंमती वाढण्यात झाला होता. मागील वर्षी 106.84 मिलियन टन गव्हाचे उत्पादन झाले होते. त्या तुलनेत 2021 मध्ये 109.59 मिलियन टन उत्पादन झाले होते. यावर्षीही उष्णतेच्या लाटेचा गहू पिकावर परिणाम झाला तर किरकोळ (Wheat prices in India) बाजारात गव्हाच्या किंमती चढ्याच राहू शकतात.

देशात गव्हाचा तुटवडा (Wheat shortage in India)

दरम्यान, गव्हाच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय गोदामातील गहू खुल्या बाजारात विक्री केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. रशिया-युक्रेन युद्धामुळे परदेशातून भारतात आयात होणाऱ्या गव्हाचे प्रमाणही कमी झाले आहे. काही दिवसांपूर्वी मिल्स आणि विविध उद्योगांना गहू आणि आट्याचा पुरवठा होत नव्हता. अशात देशांतर्गत उत्पादन घटले तर त्याचा परिणाम किंमतींवर दिसून येईल.