Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Poll Expenditure limit : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा किती असते?

Poll Expenditure limit : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा किती असते?

Image Source : www.thehindu.com

निवडणूक आयोगाने अद्याप तेलंगणा राज्याचा निवडणूक (Telangana Election) कार्यक्रम जाहीर केला नाही. मात्र तेथील सत्ताधारी बीआरएस (भारत राष्ट्र समिती -BRS) पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण लोकसभा आणि विधानसभेसाठी उमेदवारांना निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा किती आहे हे जाणून घेऊ

आगामी  वर्ष भराच्या काळात जवळपास अर्धा डझन राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यातच तेलंगणाची निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणूक आयोगाने अद्याप तेलंगणा राज्याचा निवडणूक (Telangana Election) कार्यक्रम जाहीर केला नाही. मात्र तेथील सत्ताधारी बीआरएस (भारत राष्ट्र समिती -BRS) पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण लोकसभा आणि विधानसभेसाठी उमेदवारांना निवडणुकीसाठी खर्चाची किती मर्यादा (election expenditure limit) आहे याबाबतची माहिती जाणून घेऊयात...

2022 मध्ये निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ

2023 च्या अखेरपर्यंत देशात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या संदर्भातील निवडणूक कार्यक्रम येत्या एक दीड महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक भावी उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणूक म्हणजे खर्च आलाच, मात्र या खर्चाला निवडणूक आयोगाकडून काही मर्यादा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. जानेवारी 2022 मध्ये निवडणुकीच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांसाठी ही खर्चाची मर्यादा वेगवेगळी आहे. मतदारांची संख्या आणि महागाईचा दर यानुसार निवडणुक आगोयाकडून खर्चाची रक्कम निश्चित करण्यात येते.

किती आहे खर्चाची मर्यादा

निवडणूक आयोगाने निवडणूक 2022 मध्ये वाढवून दिलेल्या खर्चाची मर्यादे नुसार आता आगामी निवडणुकीसाठी लोकसभा उमेदवारांना  95 लाख रुपये, तर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना 40 लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. ही खर्चाची मर्यादा मोठ्या राज्यासांठी लागू आहे. तसेच गोव्यासारख्या लहान राज्यासाठी खर्चाची मर्यादा ही लोकसभेसाठी 75 लाख आणि विधानसभेसाठी 28 लाख रुपये इतकी आहे. निवडणुकीला उभा राहणाऱ्या उमेदवारांना या मर्यादेच्या बाहेर खर्च करता येणार नाही.

यापूर्वी किती होती मर्यादा-

2022 पूर्वी झालेल्या निवडणुकांसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा ही  लोकसभेसाठी 70 लाख आणि विधानसभेसाठी 28 लाख रुपये इतकी होती. तर लहान राज्यांसाठी लोकसभा उमेदवारास 54 लाख आणि विधानसभेसाठी 20 लाखांची मर्यादा होती.