Excitel या इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनीने ग्राहकांसाठी एक खास ऑफर सुरू केली आहे. कंपनीकडून ग्राहकांना एकाच रिचार्ज मध्ये इंटरनेटसह OTT आणि टीव्ही चॅनलची सेवा उपलब्ध करून देणार आहे. याच बरोबर कंपनीकडून ब्रॉडबँडचे स्वस्तातील विविध प्लॅनही सुरू केले आहेत. तसेच तुम्ही वेगवेगळ्या डिव्हाईसवर याचा लाभ घेता येणार आहे.
भारतीय इंटरनेट सेवा प्रदाता (ISP), Excitel ने Disney+ Hotstar सोबत भागीदारी केली आहे. जेणेकरून त्यांच्या ग्राहकांना प्रीमियम OTT वापरचा आनंद मिळेल. Excitel या कंपनीचा नवीन ब्रॉडबँड प्लॅन घेऊन ग्राहकांना आता Disney+ Hotstar वर त्यांच्या आवडते शो, चित्रपट आणि लाइव्ह स्पोर्ट्सचा आनंद घेता येणार आहे. ग्राहकांना हे पॅकेज केवळ 599 रुपये दरमहा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध करून दिले जाणार आहे.
400 Mbps स्पीड, 12 OTT
एक्साइटेल ब्रॉडबँड सुविधा देणाऱ्या या कंपनीने डिस्ने प्लस हॉटस्टार यांच्यासोबत भागीदारी केली आहे. त्यामाध्यमातून एक्साइटेलच्या ग्राहकांना प्रीमियम फायदे दिले जाणार आहेत. एक्साइटेल इंटरनेट पॅक सोबत ग्राहकांना डिस्नेप्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शनही दिले जाणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Excitel च्या नवीन प्लॅनमध्ये 599 रुपये दरमहा 400 Mbps स्पीड, 12 OTT चॅनेल आणि 550 हून अधिक टीव्ही चॅनेल उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त, कंपनीकडे 999 रुपये दरमहा वार्षिक योजना देखील आहे, जी 300 Mbps वाय-फाय स्पीड, 6 OTT अॅप सबस्क्रिप्शन, 300+ लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि 32" फ्रेमलेस स्मार्ट एलईडी टीव्ही देते, जे वापरकर्त्यांना प्रदान करते.
OTT सबस्क्रिप्शन नियम
OTT सबस्क्रिप्शन कालावधी हा Excitel ब्रॉडबँड प्लॅनच्या वैधता कालावधी सारखाच असेल. तसेच OTT सबस्क्रिप्शन प्लॅनची एक्सपायरी तारीख ऑफर केलेल्या विविध OTT सबस्क्रिप्शनसाठी वेगळी असू शकते. OTT सबक्रिप्शन केवळ 200Mbps, 300Mbps आणि 400Mbps बहु-महिना योजनांवर उपलब्ध आहे. त्याचे कोणतेही कारण न देता त्यात सुधारणा/बदल करण्याचा प्रत्येक अधिकार Excitel नेहमी राखून ठेवेल.