Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flipkart Big Billion Days सेलमध्ये प्रत्येक दिवशी मिळणार स्मार्टफोन खरेदीवर फाडू ऑफर

Flipkart

प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स Big Billion Days Sale मध्ये सादर केले जाणार आहेत. बाजारभावापेक्षा कमी दरात हे स्मार्टफोन्स ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. प्रत्येक फोनमागे किमान 5 ते 10 हजार रुपयांची सवलत ग्राहकांना दिली जाऊ शकते असा अंदाज आहे.

गेले कित्येक दिवस अनेक ग्राहक फ्लिपकार्टच्या  बिग बिलियन डेज सेलची वाट बघत होते. या सेलमध्ये बहुतांश ग्राहक हे स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर दिल्या जाणाऱ्या घसघशीत ऑफर्सची वाट बघत असतात. यंदाच्या Big Billion Days Sale मध्ये देखील ग्राहकांना त्यांच्या आवडीचे मोबाईल खरेदी करता येणार आहेत तेही फाडू सवलतीसह!

फ्लिपकार्टने सेल लवकरच जाहीर केला जाईल असे सोशल मिडिया पोस्टवर आणि त्यांच्या अधिकृत साईटवर जाहीर केलेले असले तरी अजूनही या सेलची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. मात्र मिडिया रिपोर्टनुसार 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत फ्लिपकार्टवर वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन फिचर केले जाणार आहेत. रोज एका कंपनीचे स्मार्टफोन सवलतीच्या दरात फ्लिपकार्ट विकणार आहे.

कशी होईल विक्री?

फ्लिपकार्टने त्यांच्या वेबसाईटवर ठरलेल्या दिवशी ठरलेल्या स्मार्टफोन्सची विक्री केली जाणार असल्याचे म्हटले आहे. फ्लिपकार्टच्या वेबसाईटनुसार 28 सप्टेंबर रोजी मोटोरोला (Motorola), 29 तारखेला विवो (Vivo), 31 रोजी इन्फिनिक्स (Infinix), 2 ऑक्टोबरला नोथिंग (Nothing), 3 ऑक्टोबर ररोजी सॅमसंग (Samsung), 4 ऑक्टोबर रोजी पोको (POCO), 5 ऑक्टोबर रोजी Google पिक्सेल (Google Pixel), 6 ऑक्टोबर रोजी Realme 7 चे मोबाईल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय 7 ऑक्टोबरला Xiaomi आणि 8 ऑक्टोबरला Oppo चे मोबाईल ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

मिळेल अतिरिक्त सवलत!

प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन्स Big Billion Days Sale मध्ये सादर केले जाणार आहेत. बाजारभावापेक्षा कमी दरात हे स्मार्टफोन्स ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. प्रत्येक फोनमागे किमान 5 ते 10 हजार रुपयांची सवलत ग्राहकांना दिली जाऊ शकते असा अंदाज आहे.

याशिवाय बजाज फायनान्स, HDFC, Yes Bank व इतर बँकांच्या वित्त सहाय्याने ग्राहकांना No Cost EMI चा आणि इन्स्टंट कॅशबॅकचा फायदा देखील घेता येणार आहे.