Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ethanol blending in Petrol: पेट्रोलमधील इथेनॉलचं प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त

Ethanol blending in Petrol

Image Source : www.energy.economictimes.indiatimes.com

2013-14 साली पेट्रोलमध्ये फक्त सुमारे दीड टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जात असते. मात्र, हे प्रमाण मागील काही वर्षात वाढले आहे. तांदळाच्या काडापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प पानीपतमधे आणि आसामधील नुमालीगढ येथे बांबूपासून इथेनॉल निर्मितीचे दोन मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ करण्यात येत आहे. देशामध्ये मका, ऊस यापासून इथेनॉल निर्मितीही वाढवण्यात आली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 10.17% वर पोहचल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी सांगितले. याआधी इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, आता त्यात वाढ करण्यात आली आहे.

2013-14 साली पेट्रोलमध्ये फक्त सुमारे दीड टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जात असते. मात्र, हे प्रमाण मागील काही वर्षात वाढले आहे. तांदळाच्या काडापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प पानिपतमध्ये आणि आसामधील नुमालीगढ येथे बांबूपासून इथेनॉल निर्मितीचे दोन मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पांद्वारे देशात ग्रीन एनर्जी तयार केली जाते. तसेच प्रदूषण कमी होण्यासही मदत होत असल्याचे पुरी यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना पुरी यांनी ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाबद्दलही माहिती दिली. भारत जागतिक स्तरावर ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया निर्मिती करणारा देश बनण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे 2030 पर्यंत देशाचे इंधन आयातीवरील 1 लाख कोटी रुपये वाचतील, असेही ते म्हणाले. मागील आठवड्यात केंद्रीय कॅबिनेटने ग्रीन हायड्रोजन मिशनला मान्यता दिली. या प्रकल्पासाठी 19 हजार 744 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

झिरो कार्बन मिशन

2070 पर्यंत झिरो कार्बन उत्सर्जनचं टार्गेट भारताला गाठायचंय. त्यामुळे पर्यायी इंधन निर्मितीला चालना देण्यात येत आहे. सरकारी तेल निर्मिती कंपन्यांनाही झिरो कार्बन एमिशनचं टार्गेट ठेवलं आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 2046 पर्यंत झिरो कार्बन एमिशन प्लॅन आखला आहे तर हिंदुस्तान पेट्रोलियमने 2040 पर्यंत कार्बन उत्सर्जन न करण्यासाठी योजना आखली आहे. तेल कंपन्या पर्यायी इंधन निर्मितीवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे केंद्रीय मंत्री पूरी यांनी सांगितले.