Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPF Vs NPS: निवृत्तीसाठी कुठे केलेली गुंतवणूक ठरेल फायद्याची, सविस्तर जाणून घ्या

EPF Vs NPS

Image Source : www.godigit.com

EPF Vs NPS: तुम्हीही निवृत्तीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सरकारकडून चालवण्यात येणारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) हे दोन उत्तम गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यापैकी कुठे गुंतवणूक केल्यावर तुमचा फायदा होईल, जाणून घेऊयात.

नोकरी सुरू असताना आपल्याला महिन्याला मासिक उत्पन्न मिळते. ज्यातून आपला खर्च चालतो. मात्र निवृत्तीनंतर देखील उत्पन्नाचा सोर्स चालू राहावा असे वाटत असेल, तर नोकरी करत असतानाच आर्थिक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात आणि सन्मानाने जगात यावे, यासाठी सरकारकडून अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत.जर तुम्ही देखील निवृत्तीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) हे दोन चांगले गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहे. परंतु यापैकी कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली, तर ती तुमच्या फायद्याची ठरेल, जाणून घेऊयात.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबद्दल (EPFO) जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही संस्था भारत सरकारतर्फे चालवण्यात येते. सेवानिवृत्तीनंतर सदस्यांना मिळकतीची सुरक्षा पुरवण्यासाठी EPFO अनेक योजना चालवते. कर्मचाऱ्यांची संख्या 20 पेक्षा जास्त असलेल्या प्रत्येक कंपनीला ‘EPFO’मध्ये नोंदणी करावी लागते. त्यानंतर, मासिक वेतनातील एक विशिष्ट रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये कंपनी आणि कर्मचारी दोघेही जमा करतात.

कर्मचाऱ्याच्या निवृत्तीपर्यंत अथवा नोकरी सुरु असेपर्यंत पीएफमध्ये महिन्याला गुंतवणूक केली जाते. हा पर्याय केवळ कर्माचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. यामधील व्याजदर दरवर्षी निश्चित करण्यात येतो. यामध्ये 8.15 टक्क्यापर्यंत व्याजदर देण्यात येत आहे. यात एम्प्लॉयर किवा तुमची कंपनी कर्मचाऱ्या इतकाच हिस्सा जमा करते.

EPFO मध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्याचे दोन भाग केले जातात. यातील पहिल्या भागातील रक्कम कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर व्याजासह एकत्रच देण्यात येते. तर उर्वरित रक्कम ही पेन्शन फंडातील असते, जी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतरच मिळते.

राष्ट्रीय पेन्शन योजनेबद्दल जाणून घ्या

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) सरकारने 2004 मध्ये लॉन्च केली.या योजनेत कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. यामुळेच या योजनेला वॉलेंटरी पेन्शन योजना (Voluntary Pension Scheme) असे देखील म्हणतात. या योजनेत वयाच्या 60 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते. ज्यामुळे निवृत्तीपर्यंत मोठा फंड तयार करता येऊ शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती, मात्र 2009 नंतर ही योजना सर्वांसाठी खुली करण्यात आली.

महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना ही मार्केट लिंक्ड योजना आहे. यात इक्विटी, गव्हरमेंट डेब्ट आणि कॉर्पोरेट डेब्ट यामध्ये पैसे गुंतवले जातात. ज्यामुळे यातील रिटर्न निश्चित नसतात. या योजनेत अ‍ॅन्युइटी (annuity) खरेदी करावी लागते. या खरेदी केलेल्या अ‍ॅन्युइटीमधून त्या व्यक्तीला नियमित पेन्शन (pension) मिळते.

राष्ट्रीय पेन्शन खाते ओपन झाल्यावर गुंतवणूकदाराला एक पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) दिला जातो. हा एक युनिक खाते नंबर असून यामध्ये कोणताही बदल करण्यात येत नाही. या नंबरच्या मदतीने तुम्ही तुमचे NPS खाते कुठूनही ऑपरेट करू शकता.

एनपीएसच्या दोन्ही खात्यांना या नंबरच्या मदतीने ऑपरेट करता येते. यामधील पहिले खाते हे टियर 1 असून याचा वापर निवृत्तीकरिता पैसे जमा करण्यासाठी केला जातो. तर टियर 2 खाते हे ऐच्छिक खाते आहे. ज्याचा वापर सेव्हिंग साठी केला जातो. NPS मध्ये गुंतवणुक करण्यापूर्वी तुम्ही गुंतवणूकदारांचा सल्ला घेऊ शकता. संपूर्ण माहिती घेऊनच यामध्ये गुंतवणूक करा. ही योजना सरकारची असल्याने यामध्ये फसवणूक होणार नाही.

Source: hindi.moneycontrol.com