Table of contents [Show]
सामाजिक सहवास हवा!
2019-20नंतर कोविडनं (Covid) धुमाकूळ घातला. सार्वजनिक वावरण्यावर मर्यादा आल्या. यात मोठी समस्या होती ती कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्याची. अशावेळी मधला मार्ग उपलब्ध झाला तो वर्क फ्रॉम होमचा. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनाही ही संकल्पना आवडली. मात्र अलिकडेच झालेल्या विविध सर्वेक्षणातून (Survey) असंच दिसून आलंय, की आता कर्मचाऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांशी बोलायला, गप्पा मारायला आणि कार्यालयीन काम एकत्र करायला आवडते. झी बिझनेसनं यासंबंधीचं वृत्त दिलंय. सामाजिक सहवास सर्वांना हवाय. या सर्वेक्षणात जवळपास 78 टक्के म्हणजेच 10 पैकी 8 जणांना वर्क फ्रॉम होम नको तर वर्क फ्रॉम ऑफीस हवं आहे.
लिंक्डइनचा अहवाल
रोजगाराशी संबंधित संस्था लिंक्डइननं याबाबतचा अहवाल दिलाय. त्यांच्या मते, 78 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम ऑफीस करायला आवडेल. लॅपटॉपवर घरून काम करण्यापेक्षा शारीरिकरित्या कार्यालयात जाऊन डेस्कटॉप अथवा लॅपटॉपवरून काम करण्यास कर्मचाऱ्यांचं प्राधान्य आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत वर्क फ्रॉम ऑफीसचा आग्रह धरणाऱ्यांची टक्केवारी प्रचंड वाढली आहे. हा अहवाल 18 वर्षांच्या वरील कर्मचाऱ्यांवर केलेल्या संशोधनावर आधारलेला आहे. 28 फेब्रुवारी ते 6 मार्च 2023 या कालावधीत करण्यात आलं आहे.
काय आहे डेस्क बॉम्बिंग?
डेस्क बॉम्बिंग असा एक नवा ट्रेंड आलाय. कर्मचाऱ्यांना तो खूप आवडतोय. आपल्या सहकाऱ्यांसोबत गप्पा मारणं, कामाशी संबंधित चर्चा करणं असा स्वरुपाचा हा ट्रेंड आहे. अनेकांना डेस्क बॉम्बिंग हा प्रकार हवाहवासा वाटतोय. इतरांशी इन्टरॅक्ट करण्याचा तो एक चांगला पर्याय अनेकांना वाटतोय. GenZ ही आणखी एक संकल्पना आहे. GenZ म्हणजे 1990 ते 2010 यादरम्यान जन्म झालेले विविध कार्यालयीन कर्मचारी.
करिअरला अडथळा
कोरोना आटोक्यात येत असताना पुन्हा वर्क फ्रॉम होमवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. हायब्रिड वर्क कल्चरचा उत्पादकतेवर परिणाम होत असल्याचा सूर उमटू लागला. गुणवत्तेवर तर परिणाम आहेच मात्र त्यासोबतच संबंधित कर्मचाऱ्याच्या करिअरवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशा शक्यता वर्तवण्यात आल्या. वर्क फ्रॉम होम हे करिअर ग्रोथसाठी अडथळा ठरत असल्याचे अहवालानुसार समोर येत आहे.