इलॉन मस्क (Elon Musk) यांनी नुकसानीच्या रेकॉर्डमध्ये आधीचे रेकॉर्डधारक असलेले जपानी टेक गुंतवणूकदार मासायोशी सोन ज्यांना 2000 मध्ये 58.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. त्यांना इलॉन मस्क याने मागे सारत हा रेकॉर्ड आपल्या नवावर करून घेतला आहे. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, इलॉन मस्क याची एकूण संपत्ती नोव्हेंबर 2021 मध्ये 320 अब्ज डॉलर होती. ती मंगळवारी 137 अब्ज डॉलरवर आली आहे. फोर्ब्सने मस्कच्या एकूण संपत्तीमध्ये झालेल्या घसरणीला निव्वळ मूल्यातील घसरणीचे श्रेय टेस्लाच्या शेअर्सना दिले आहे, ज्यामध्ये मस्क हे CEO आणि सर्वात मोठे भागधारक आहेत. फोर्ब्सच्या मते मस्कच्या संपत्तीतील ही घसरण त्याने एप्रिलमध्ये 44 बिलियन डॉलर्सला ट्विटर विकत घेतल्यानंतर आली आहे आणि ही घसरण सुमारे 65 टक्क्यांची आहे.
मस्क यांनी ट्विटरच्या डीलसाठी लागणारे पैसे गोळा करताना त्यांनी टेस्लामधील 7 बिलियन डॉलर्सचे शेअर्स विकले होते व नोव्हेंबरमध्ये पुन्हा 4 बिलियन डॉलर्सचे शेअर्स विकले. त्यानंतर गेल्या महिन्यात त्यांनी आणखी 3.58 बिलियन डॉलर्स किमतीचे शेअर्स विकले होते. त्यामुळे एप्रिलमध्येच त्यांची संपत्ती एकूण 23 बिलियन डॉलर्सपेक्षा कमी झाली होती.
टेस्लाचे शेअर्स कोसळल्यामुळे मस्कने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपला दर्जा गमावला असून त्यांना फ्रेंच फॅशन आणि कॉस्मेटिक्स मॅग्नेट बर्नार्ड अरनॉल्ट यांनी मागे टाकले आहे. इलॉन मस्कने ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर अनेक कंपन्यांनी ट्विट्रवर त्यांच्या जाहिराती बंद केल्या. त्यामुळे ट्विटरच्या महसुलात मोठी घट आली, असे म्हटले जाते. ट्विट्रचे भलेमोठे कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत असलेले मस्क टेस्लाकडून मिळालेला पैसा ट्विटर कर्जासाठी वापरात असल्याचा दावा अनेक आर्थिक विश्लेषकांनी केला.
'डॉट-कॉम' कंपनीच्या क्रॅश दरम्यान कंपनीतील सॉफ्टबँक र्णपणे उध्वस्त झाली होती. त्यामुळे मासायोशी सोन यांची संपत्ती 78 अब्ज डॉलरवरून 19.4 अब्ज डॉलरपर्यंत घसरली. कंपनीने त्यानंतर अमेरिका आणि ब्रिटनमधील वेगवेगळ्या टेक्निकल कंपन्या विकत घेऊन, पुन्हा नव्याने डॉट-कॉम कंपनी सुरू केली.
इलॉन मस्क यांनी ज्या पद्धतीने स्वत:ची टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. ते पाहता मस्क भविष्यात या स्थानावर पुन्हा आले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असे गिनीजच्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले.