Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter Accounts: ट्विटरवर अॅक्टिव नसाल तर तुमचे खाते बंद होईल? मस्क यांची मोठी घोषणा

delete inactive twitter accounts

जर तुम्ही मागील खूप दिवसांपासून ट्विटर खाते वापरले नसेल किंवा त्यामध्ये कोणतीही अॅक्टिवीटी केली नसेल. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ट्विटर साइटवरील सुमारे 1.5 कोटी निष्क्रिय खाती काढून टाकण्याची घोषणा कंपनीचे मालक एलन मस्क यांनी केली आहे.

जर तुम्ही मागील खूप दिवसांपासून ट्विटर खाते वापरले नसेल किंवा त्यामध्ये कोणतीही अॅक्टिवीटी केली नसेल. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ट्विटर साइटवरील सुमारे 1.5 कोटी निष्क्रिय खाती काढून टाकण्याची घोषणा कंपनीचे मालक एलन मस्क यांनी केली आहे. ट्विटरचे अधिग्रहण केल्यापासून मस्क यांनी कंपनीमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यापैकी हा एक निर्णय आहे.


ट्विटर सर्व्हरवर उपलब्ध होणार स्पेस (Remove unwanted space from server)


निष्क्रिय खात्यांच्या देखभालीचा खर्च जास्त असू शकतो. त्यासाठी कंपनीची  मेहनत आणि संसाधनेही खर्च होत असावीत. त्यामुळे हा निर्णय कंपनीने घेतला असावा.  सुमारे दीड अब्ज खाती काढून टाकल्यानंतर ट्विटरच्या सर्व्हरवरचा डेटा मोठ्या प्रमाणात मोकळा होईल. तसेच युजर्सची संख्याही कमी होईल. फेक खाते ट्विटरवरून काढून टाकण्याची घोषणा मस्क यांनी आधीच केली आहे. एकदा वापरकर्त्याने एखादे नाव घेतेल तर तेच नाव दुसऱ्या वापरकर्त्याला घेता येत नाही. आता ही अब्जावधी खाती डिलीट केल्यानंतर अनेक युजरनेम ऑप्शन वापरकर्त्यांना उपलब्धही होतील.  


मस्क यांचे धडाकेबाज निर्णय (Elon Musk decisions in twitter)


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी 27 ऑक्टोबर 2022 रोजी ट्विटर 44 अब्ज डाॅलरमध्ये विकत घेतले आहे. ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी अनेक क्रांतीकारक निर्णय घेतले आहेत. खर्चामध्ये कपात करण्यासाठी त्यांनी जवळपास निम्मी कर्मचारी कपात केली. कंपनीचे दररोज ४० लाख डॉलर्सचे दररोज नुकसान होते. त्यामुळे आम्हाला कर्मचारी कपातीशिवाय पर्याय नाही, असे म्हणत त्यांनी नोकरकपातीचे समर्थन केले. ट्विटर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बंदी घातलेली खाते पुन्हा सुरू करण्याच्या बाजूने मस्क आहेत. खूप कमी काळात घेतलेल्या या मोठ्या निर्णयांमुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले.  

महसूल वाढवण्यासाठी कंपनीचे प्रयत्न (Twitter trying to improve revenue)

नुकतेच काही देशांमध्ये 8 डाॅलरमध्ये ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन फी आकारण्यास सुरुवात केली आहे. वापरकर्त्यांनी ते विकत घेतले नाही तर ते त्यांचे सत्यापित टिकमार्क गमावतील. मात्र, बनावट खात्यांची संख्या वाढल्यानंतर ही सदस्यता थांबवण्यात आली आहे. 


ब्लू सबस्क्रिप्शन लाँच करण्याची कारणे (Blue check subscription)

कंपनीला दररोज 32 कोटींचा तोटा होत आहे. हा तोटा थांबविण्यासाठी महसूल कमावण्याचे इतर मार्ग कंपनी शोधत आहे. मस्कने ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले. त्यांना लवकरच त्याची भरपाई करायची आहे. ट्विटरवरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी तसेच फक्त जाहिरातींतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कंपनीने पैसे वाचवण्यासाठी नोकर कपा केली आणि इतर मार्गांनी पैसे कमावण्यासाठी पर्याय शोधण्यासाठी सुरुवात केली आहे.