Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is the Other way to Earn Money in The Share Market: शेअर बाजारात खरेदी-विक्रीसह इतर मार्गाने ही कमवा पैसा

What Other Ways Can You Make Money By Buying Share Market

What Other Ways Can You Make Money By Buying Stock: पूर्वीपेक्षा आजकाल शेअर बाजारसंबंधी अधिक चर्चा कानावर पडते. हल्ली बहुतेक लोक शेअर बाजारसंबंधी व्यवसाय करण्यास तयार असतात. याच व्यवसायात तुम्ही खरेदी-विक्रीसह इतर मार्गानेदेखील पैशांची कमाई करू शकता, यासंबंधी अधिक जाणून घेवुयात.

What Other Ways Can You Make Money By Buying Share Market: सध्याच्या तरूणांना शेअर मार्केटने (Share Market)आकर्षित केले आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात तरूणाई शेअर बाजाराचा अभ्यास करताना दिसत आहे. पूर्वीपेक्षा ही आता शेअर बाजाराकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे हा व्यवसाय सध्या बाजारात भाव खात आहे. मात्र शेअर बाजारात खरेदी-विक्री व्यतिरिक्त तुम्ही इतर मार्गाने ही पैश्यांची कमाई करू शकता, त्याबाबत अधिक जाणून घेवुयात. 

दीर्घकाळ गुंतवणूक (Long Term Investment)

गुंतवणूक करणे हे कधी ही चांगलेच लक्षण आहे. तुम्ही कधी ही एखादया चांगल्या कंपनीच्या शेअर्समध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करू शकता, जी कंपनी तुम्हाला चांगला परतावा देवू शकते. त्याचबरोबर दर महिन्याला काही ठराविक रक्कमचे शेअर्स खरेदी करू शकता व जेणेकरून आपल्या गुंतवणूकीत वाढ होईल. एखादया बॅंकेत किंवा पोस्टामध्ये आपणे ज्याप्रमाणे आरडी सुरू करतो, त्याप्रमाणे तुम्हाला दर महिन्याला शेअर्समध्ये एक चांगली रक्कमेचे गुंतवणूक करता येईल. जेणेकरून तुम्ही शेअर्सची विक्री करू शकता. 

डेली ट्रेडींग (Daily Trading)

डेली ट्रेडींग म्हणजे दररोज कमाई करणे. यासाठी शेअर बाजारात एक ठराविक भांडवलची गुंतवणूक करून, तुम्ही रोज कमाई करू शकता. ज्या व्यक्तींनी डेली ट्रेडींग करायची नसेल, त्या व्यक्तीसाठी स्विंग ट्रेडींग हा पर्यायदेखील उपलब्ध आहे. ती व्यक्ती याव्दारेदेखील नफा प्राप्त करू शकते. जसे की, स्विंग ट्रेडींगमध्ये आज घेतलेले शेअर्स वाढले नाही, तर उद्या किंवा परवा ते शेअर्स जेव्हा वाढेल त्यावेळी त्याची विक्री करून फायदा मिळवू शकता.

बोनस शेअर्स (Bonus Shares) 

शेअर बाजारात काही कंपन्या बोनस शेअर्सदेखील देतात. उदा, एकास एक, दोनास एक अशा प्रमाणात कंपन्या या शेअर्स देतात.जसे की, समजा तुमच्याकडे एक शेअर्स असेल तर तुम्हाला कंपनी आणखी एक बोनस शेअर्स देते. आता हेच पहा, तुम्ही जर चांगले शेअर्स दीर्घ काळासाठी ठेवल्यास, तुमच्या बोनस शेअर्सची संख्या वाढू शकते. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक केलेल्या शेअर्सवर अफलातून परतावा प्राप्त करू शकता.