Hostel Subsistence Allowance Scheme: गुणवत्ता असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणाला मुकावे लागते. तर अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे शिक्षणासाठी शहरात वास्तव्याचा. काही महाविद्यालयात वसतिगृहची सुविधा उपलब्ध असते, तर काही ठिकाणी विद्यार्थ्याना भाड्याने रुम घेऊन राहावे लागते. परंतु एवढा खर्च करु शकणार अशी देखील काही विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते.
शेतमजुरांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण घेता यावे,पैशांच्या अभावी त्यांची राहण्याची गैरसोय झाल्यास त्यांचे शिक्षण अपूर्ण राहू नये, यासाठी प्रत्येक महिन्यात दोन ते तीन हजार व्यावसायिक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सुरु करण्यात आली.
Table of contents [Show]
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील अल्पभूधारक शेतकरी, तसेच नोंदणीकृत कामगार ज्यांच्या मुलांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय महाविद्यालयात किंवा तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने आणलेली डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेच्या अंतर्गत शासकीय, शासन अनुदानित आणि विनानुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा तंत्रनिकेतन महाविद्यालयात अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता दिल्या जातो.
या योजने अंतर्गत महानगरात जसे मुंबई महानगर, पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना तीन हजार रुपये म्हणजेच दहा महिन्यासाठी 30,000 रुपये दिल्या जाते. तर या शहरांव्यतिरिक्त दुसऱ्या शहरांमध्ये अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये दरमहिन्याला म्हणजेच दहा महिन्यासाठी 20,000 रुपये दिल्या जाते.
योजनेची वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत ही योजना राबविली जाते.
- या योजनेच्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांना शिष्यवृत्ती दिली जाते.
- उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
- ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे दोन्ही पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये पर्यंत आहे, अशा विद्यार्थ्यांकारिता ही योजना आहे.
- डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता विस्तारित योजनेला लागू करण्यास शासनाने वर्ष 2018 पासून मान्यता दिली.
पात्रता आणि अटी काय आहेत
- या योजनेंतर्गत अर्जदार विद्यार्थ्याचे पालक अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत कामगार असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी या सबंधित कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- लाभार्थी विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये ते 8 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.
- तसेच अर्ज करतांना कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्नाचे अधिकृत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे, आणि रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- या योजनेंतर्गत शासनाच्या निर्णयाप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाव्दारे व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे, तेच विद्यार्थी या योजनेसाठी किंवा शिष्यवृत्ती अनुदान साठी पात्र असतील.
- शासन निर्णयाप्रमाणे या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातील केवळ दोनच मुले या वसतिगृह निर्वाह भत्ता अनुदानासाठी अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार विद्यार्थ्यांना खाजगी वसतिगृहात राहत असल्यास किंवा खाजगी मालकीच्या घरात भाड्याने राहत असल्यास तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- शिक्षणात गॅप असल्यास गॅप सबंधित कागदपत्र सादर करावे.
- ज्या विद्यार्थ्यांनी CAP प्रणालीतून अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल, त्या विद्यार्थ्यांनी CAP सबंधित कागदपत्र अर्ज करतांना सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज करतांना कुटुंबाच्या एकूण वार्षिक उत्पन्नाचा दाखला, आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना कामगार नोंदणी प्रमाणपत्र आणि अल्पभूधारक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- पात्र अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.